चावरेत १४ दुकानदार पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:43+5:302021-05-30T04:20:43+5:30
पॉझिटिव्ह प्रमाण १०.२१ टक्के दिलीप चरणे लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : चावरे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीने दुकानदार व ...
पॉझिटिव्ह प्रमाण १०.२१ टक्के
दिलीप चरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : चावरे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीने दुकानदार व कामगारांची कोरोना चाचणी घेतली असता तब्बल १४ जण पॉझिटिव्ह आढळले. प्राप्त माहितीनुसार दुसऱ्या कोरोना लाटेत चावरे गावात आता पर्यंत ३९ जण बाधितपैकी ७ जण बरे, २७ जण उपचाराखाली तर तिघांचा मृत्यु झाला आहे.आता या १४ दुकानदारांचा प्रसाद कुणाला मिळाला असेल हा गावातील चर्चेचा विषय झाला आहे. गावच्या चिंतेत भर पडली आहे. 'त्या' दुकानदारांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार चावरे ग्रामपंचायतीने गावातील सर्व दुकानदार, व्यावसायिक, कामगार व सहकारी संस्थाच्या मिळून आज १३७ जणांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी १४ जन पॉझिटिव्ह आले. या अशा चाचणीत १०.२१ टक्के पॉझिटिव्ह प्रमाण आढळले. १४ जणांची सोय ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेत केली आहे.
यावेळी हातकणंगले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, पोलिस पाटील दिलीप महाडिक, शिवाजी गुरव, रावसाहेब निकम, तुकाराम देसाई, ग्रामसेविका व्ही. डी. बोराडे, तलाठी पवन सुतार उपस्थित होते.वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड, डॉ. प्रणाली सुतार, शमा सत्ती, उज्ज्वला जाधव, आशासेविका शुभांगी निकम, दीपाली निकम, किशोर महाडिक यांनी तपासणी केली.
फोटो ओळी :चावरे येथील दुकानदार व कामगार कोरोना चाचणी प्रसंगी जगन्नाथ पाटील, पोलीस पाटील, दिलीप महाडिक,
शिवाजी गुरव, रावसाहेब निकम, तुकाराम देसाई, व्ही. डी. बोराडे, तलाठी पवन सुतार आदी.
-----