विनामास्क फिरणाऱ्या कोल्हापूर शहरातील १४७ नागरीकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 06:54 PM2021-04-28T18:54:51+5:302021-04-28T18:58:55+5:30
CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केले जात असून कोरोना संबंधिचे नियम तोडणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी नियम तोडणाऱ्या १४७ नागरीकांना दंड करुन त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केले जात असून कोरोना संबंधिचे नियम तोडणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी नियम तोडणाऱ्या १४७ नागरीकांना दंड करुन त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने या प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरीही नागरीक त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून हा दंड करण्यात आला.
सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी
कोल्हापूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेच्यावीने शहरामध्ये भाजी मार्केट, मुख्य चौक व वर्दीळीच्या ठिकाणी सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने चार ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्यात येत असून बुधवारी रेल्वे स्टेशन परिसर, गोविंद पार्क, साईस एक्सेंटेशन, कमला कॉलेज परिसर, राजे संभाजी कॉलनी, माने गल्ली, सासने गल्ली, रंकाळा रोड, ताराबाई रोड, चंद्रश्वेर गल्ली, संध्यामठ गल्ली, राजारामपूरी, शाहूपूरी, मस्कुती तलाव, जोशी गल्ली, रेगे तिकटी, मस्कुती तलाव, यादवनगर, टेंबलाईवाडी, साईनाथ कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, बालाजी पार्क, नंदवन कॉलनी, दत्तभागीरथी कॉलनी, सुर्वेनगर, नाना पाटील नगर, जिवबानाना पार्क, रमणमळा, लाईन बझार, कसबा बावडा, राजोपाध्येनगर, मनोरमा नगर, तुळजाभवनी कॉलनी, पंचगंगा हॉस्पीटल, पदमाराजे शाळा, खोलखंडोबा परिसर, म्हाडा कॉलनी या ठिकाणी औषधाची फवारणी करण्यात आली.