रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध षड्यंत्रासाठी १५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:05+5:302021-03-08T04:24:05+5:30

बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध सीडी प्रसिद्ध केलेले मानव हक्क होराट समितीचे दिनेश कलहळ्‌ळी यांनी कब्बन ...

15 crore spent on conspiracy against Ramesh Jarkiholi | रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध षड्यंत्रासाठी १५ कोटी खर्च

रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध षड्यंत्रासाठी १५ कोटी खर्च

Next

बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध सीडी प्रसिद्ध केलेले मानव हक्क होराट समितीचे दिनेश कलहळ्‌ळी यांनी कब्बन पार्क पोलिसांत दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर अरभावीचे आमदार व रमेश यांचे भाऊ भालचंद्र जारकीहोळी यांनी वक्तव्य केले आहे.

सीडीमधील महिलेला पीडित असा उल्लेख करू नका, अशी विनंती भालचंद्र यांनी माध्यमांना केली आहे. कारण याप्रकरणी षड्‌यंत्र असून रमेश जारकीहोळी यांनी कोणतीही चूक केली नाही, त्या महिलेच्या मागे आणखी तिघेजण आहेत. त्यासाठी त्यांनी १५ कोटी रुपये खर्च केलेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

रमेश जारकीहोळी यांनी घराबाहेर पडून जनतेला खरी माहिती द्यावी. तक्रार देण्याआधीच व्हिडीओ यु ट्यूबला अपलोड झाला होता. यावर त्यांनी तक्रार द्यावी, असेही ते म्हणाले.

कलहळ्ळी यांना कुणीतरी मिसगाईड केले असावे. पोलिसांत तक्रार देण्याआधी रशियातून हा व्हिडीओ अपलोड झाला होता. त्यांनी तक्रार मागे घेतली आहे, मात्र याप्रकरणी मोठे षड्‌यंत्र रचले गेले आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी कुटुंबाला संपवण्याचा कट रचून रमेश यांना मंत्रिपदावरून पायउतार करावे हा उद्देश होता. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: 15 crore spent on conspiracy against Ramesh Jarkiholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.