रोटरी क्लब ऑफ सेंट्रलकडून १५ हॅपी स्कूल विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:17+5:302020-12-12T04:40:17+5:30
इचलकरंजी : येथील रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने सन २०१९-२० या रोटरी वर्षामध्ये शहर व परिसरातील १५ शाळा हॅपी ...
इचलकरंजी : येथील रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने सन २०१९-२० या रोटरी वर्षामध्ये शहर व परिसरातील १५ शाळा हॅपी स्कूल म्हणून विकसित करण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत शाळांना इमारत दुरुस्ती, शौचालय व बाथरूम बांधकाम, पेंटिंग, स्कूल बेंच, संगणक, मुलांना गणवेश, वह्या, पुस्तके देण्यात आली.
डॉ. गिरीश मसूरकर व संध्या मसूरकर (बागलकोट) यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. सदरचा उपक्रम न्यू हायस्कूल (शिवनाकवाडी), डॉ. डी. एस. बरगाले हायस्कूल (शिरदवाड), गजानन दाजी कुलकर्णी मराठी विद्यामंदिर (टाकवडे), सन्मती मतिमंद विद्यामंदिर (इचलकरंजी) या ठिकाणी पार पडला. यावेळी सहायक प्रांतपाल मनीष मुनोत, अध्यक्ष संजयसिंह गायकवाड, सचिव विमलकुमार बंब, प्रा. डॉ. प्रशांत कांबळे, घनश्याम सावलानी यांच्यासह सदस्य व शिक्षक उपस्थित होते.
(फोटो ओळी)
१११२२०२०-आयसीएच-०१
इचलकरंजीत रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने शहर व परिसरातील १५ शाळा हॅपी स्कूल म्हणून विकसित करण्यात आल्या.