HSC Result 2022: दररोज जंगली भागातून १५ कि. मी.ची पायपीट करणार्‍या शामलचे खडतर यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:27 PM2022-06-09T15:27:15+5:302022-06-09T15:27:37+5:30

मल्लेवाडी येथून बारावीचे शिक्षण घेणारी ती एकटीच. पहाटे कॉलेजला जाताना तिला अनेकवेळा गव्यांचा सामना करावा लागला.

15 km from the forest area traveling every day Success of Shamal Vitthal Pendhare in 12th exam | HSC Result 2022: दररोज जंगली भागातून १५ कि. मी.ची पायपीट करणार्‍या शामलचे खडतर यश

HSC Result 2022: दररोज जंगली भागातून १५ कि. मी.ची पायपीट करणार्‍या शामलचे खडतर यश

Next

निवास वरपे

म्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात तेरसवाडी पैकी मल्लेवाडी हे ३०० लोकवस्तीच छोटंसं खेडं. येथील शामल विठ्ठल पेंढरे या बारावीतील विद्यार्थिनीने ग. बा. पवार पाटील विद्यालय ( घानवडे) या विद्यालयात ८३. ६७  गुण प्राप्त करुन बारावीच्या परिक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

शामलची आई मंगल पेंढरे व वडील विठ्ठल पेंढरे हे दोघेही अल्पशिक्षित असून वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. गेल्या काही वर्षांपासून मल्लेवाडी गावाभोवती गव्यांची दहशत आहे. अशा या दुर्गम वाडीतून घानवडे येथे शिक्षणासाठी दररोज १५ किलोमीटरची पायपीट करत तिने यश संपादन केले.

अनेकवेळा करावा लागला गव्यांचा सामना

मल्लेवाडी येथून बारावीचे शिक्षण घेणारी ती एकटीच. पहाटे कॉलेजला जाताना तिला अनेकवेळा गव्यांचा सामना करावा लागला. भौगोलिक परिस्थितीशी सामना करत शामलने बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. तिला वर्गशिक्षक प्रकाश गोते, प्राचार्य भिमराव रायकर, संभाजी नाईक, मोहन कुंभार, रघुनाथ ठिकपुर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: 15 km from the forest area traveling every day Success of Shamal Vitthal Pendhare in 12th exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.