१५ लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Published: March 25, 2015 12:25 AM2015-03-25T00:25:23+5:302015-03-25T00:40:50+5:30

रत्नागिरी पोलिसांची कारवाई : आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल

15 lakh worth of gutka seized | १५ लाखांचा गुटखा जप्त

१५ लाखांचा गुटखा जप्त

googlenewsNext

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन, शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री ११ वाजता रत्नागिरीजवळील मिरजोळे एमआयडीसीतील एका गोदामावर संयुक्तरीत्या धाड टाकली. या कारवाईत तब्बल १५ लाख ३६ हजार १३५ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अमन तुषार देवळेकर (२३, धनजीनाका, रत्नागिरी) याच्यावर भारतीय दंडविधान ३२८ अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जप्त गुुटखा ग्रामीण पोलिसांच्या हवाली केला आहे. राज्यात गुटखाबंदीच्या ३२८ कलमान्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करून दहा वर्षांची कैद होऊ शकते, असे विधानसभेत सूचित केले होते. हा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात घडलेला हा पहिलाच गुन्हा आहे. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी रात्री ही धडक कारवाई केली. श्रीराम बॉडी बिल्डिंग सेंटर एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी जवळील गोदामात हा साठा आढळला. अमन देवळेकर या आरोेपीच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी (अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी) दिनेश ज्ञानेश्वर तांबोळी (वय ३२, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली असूून, अन्न सुरक्षा कायदा २००६ कलम २६ (२) (आय) सहवाचन, कलम २७ (३) (इ) तसेच कलम २६ (२) (आय. व्ही.) सहवाचन महा. राज्य शासन राजपत्र अधिसूचना ३१/१०६३/२०१४, दि. १५/७/२०१४ शिक्षापात्र कलम ५९ तसेच भारतीय दंडविधान २७२, २७३, १८८, ३२८ (अजामिनपात्र) अन्वये देवळेकर विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत दिनेश तांबोळी यांच्यासह, राजन साळवी, ग्रामीणचे निरीक्षक महेश थिटे, शहरचे निरीक्षक इंद्रजित काटकर व इतर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)


अन्नकडून चार बॅँ्रडचा गुटखा जप्त
अन्न औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत चार कंपन्यांचा गुटखा जप्त केला आहे. त्यात सारारचे पावणेदहा लाख किंमतीचे दोन हजार पाऊच, राज कोल्हापूर गुटख्याचे दोन लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचे एक लाख ५५ हजार २०० पाऊच, सचिन गुटख्याचे दोन लाख २८ हजार ७३५ रुपयांचे दोन लाख २८ हजार ७३५ पाऊच, आरएमडीचे ४२ हजार रुपये किमतीचे सहा हजार पाऊच यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या वर्षभरात दिडशे दुकानांची तपासणी केली. मात्र, त्यात कुठेही गुटखा विक्री आढळली नसल्याची माहिती अन्न, औषध प्रशासन रत्नागिरी विभागाचे निरीक्षक दिनेश तांबोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: 15 lakh worth of gutka seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.