विशाखापट्टणमहून कोल्हापुरात आला १५ टन ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:00+5:302021-04-24T04:26:00+5:30

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून प्रतीक्षा असलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अखेर शुक्रवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाली. विशाखापट्टणम येथून १५ टन ...

15 tons of oxygen came to Kolhapur from Visakhapatnam | विशाखापट्टणमहून कोल्हापुरात आला १५ टन ऑक्सिजन

विशाखापट्टणमहून कोल्हापुरात आला १५ टन ऑक्सिजन

Next

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून प्रतीक्षा असलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अखेर शुक्रवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाली. विशाखापट्टणम येथून १५ टन घेऊन आलेला हा टँकर खास रेल्वेने कोल्हापुरात पोहोचला.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही आठ दिवसांत दुपटी तिपटीने वाढली. मागणी व पुरवठा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेेशकडे ऑक्सिजनची मागणी केली होती. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ या नावाने रेल्वे बुधवारीच विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन आणण्यासाठी रवाना झाली. दरम्यान, देशभर ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरून हाहाकार उडाला असल्याने प्रत्येक राज्य, जिल्ह्याकडून अडवणूक होणार असल्याचे गृहीत धरून ही रेल्वे ऑक्सिजन घेऊन कधी पोहोचणार याबाबतीत प्रशासकीय पातळीवर कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

दरम्यान, ऑक्सिजनने भरलेला टँकर अडविल्यावरून कोल्हापूर व सातारा जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. वाद मिटल्यानंतर संध्याकाळी हा टँकर कोल्हापूरकडे रवाना झाला. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर १५ टनांचा एक टँकर कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला. दरम्यान, हा टँकर रात्री दहा वाजता पोहोचणार असला तरी प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच तो उतरवून घेण्याची पूर्वतयारी करून ठेवण्यात आली आहे. मार्केट यार्डातील रेल्वे गुडस येथे मध्य रेल्वेच्या मिरज जंक्शनमधील बांधकाम विभागाने टँकर उतरविण्यासाठी विशेष रॅम्प तयार करून घेतला आहे.

Web Title: 15 tons of oxygen came to Kolhapur from Visakhapatnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.