गडहिंग्लज विभागात ‘महावितरण’ची २० दिवसांत १.५० कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:44+5:302020-12-23T04:21:44+5:30

राम मगदूम। गडहिंग्लज : कोरोनामुळे गडहिंग्लज विभागातील ग्राहकांकडून महावितरणची १५ कोटीची वीज बिले थकीत आहेत. त्याच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या ...

1.50 crore recovered by Mahavitaran in Gadhinglaj division in 20 days | गडहिंग्लज विभागात ‘महावितरण’ची २० दिवसांत १.५० कोटींची वसुली

गडहिंग्लज विभागात ‘महावितरण’ची २० दिवसांत १.५० कोटींची वसुली

Next

राम मगदूम।

गडहिंग्लज : कोरोनामुळे गडहिंग्लज विभागातील ग्राहकांकडून महावितरणची १५ कोटीची वीज बिले थकीत आहेत. त्याच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या घर-ते-घर संपर्क मोहिमेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २० दिवसांत साडेतीन हजार ग्राहकांकडून तब्बल दीड कोटीची वसुली झाली.

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक मिळून एक लाख ३५ हजार वीजग्राहक आहेत. त्यांपैकी ४० हजार ७१४ ग्राहकांनी १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२० अखेर एकही बिल भरलेले नाही. त्यामुळे थकबाकी १५ कोटींवर गेली. तिच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात सरपंच ते आमदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, गाववार मेळावे घेऊन वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर आता घर-ते-घर मोहीम सुरू आहे. एकूण थकबाकीपैकी ३२ टक्के रक्कम भरणाऱ्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी सोयीचे हप्ते पाडून दिले जात आहेत.

प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लजचे उपकार्यकारी अभियंता सागर दांगट, नेसरीचे संदीप दंडवते, आजऱ्याचे दयानंद कामतगी, चंदगडचे विशाल लोधी व त्यांचे सर्व सहकारी मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत.

------------------------------

* तालुकानिहाय थकबाकी व वसुली (कंसात लाखात)

- गडहिंग्लज : ५.८८ कोटी (५८.३०), आजरा - २.७४ कोटी (४१.८५), चंदगड - ६.३८ कोटी (४७.४७)

..............................................

* एप्रिल ते नोव्हेंबरअखेर एकही बिल न भरलेले ग्राहक तालुकानिहाय असे : गडहिंग्लज - १६२८५, आजरा - ६७३६, चंदगड - १७६९३

.................................

* दिवसात अडीच लाख जमा शनिवारी (१९) सर्वाधिक ४३६१ ग्राहक आणि एक कोटी २६ लाख ६५ हजार थकबाकी असलेल्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी शाखेअंतर्गत येणाऱ्या गावातील संपर्क मोहिमेत १५० ग्राहकांच्या भेटी घेण्यात आल्या. त्यांपैकी ४० ग्राहकांनी अडीच लाख रुपये जमा केले; तर ४० ग्राहकांनी सोयीचे हप्ते मागून घेतले.

Web Title: 1.50 crore recovered by Mahavitaran in Gadhinglaj division in 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.