गडहिंग्लज शहरात होणार १५०० देशी वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 11:44 AM2021-07-09T11:44:13+5:302021-07-09T11:47:44+5:30
environment Kolhapur: माझी वसुंधरा अभियानांतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे शहरात १५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात मेन रोडसह शहरातील ९ प्रभागांत १५ प्रकारची देशी फळ व फुल झाडे लावण्यात येणार आहेत.
गडहिंग्लज : माझी वसुंधरा अभियानांतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे शहरात १५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात मेन रोडसह शहरातील ९ प्रभागांत १५ प्रकारची देशी फळ व फुल झाडे लावण्यात येणार आहेत.
शहरातील मुल्ला चेंबर्स येथे वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभापती तथा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते या मोहिमेला प्रारंभ झाला. या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन नगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगर पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, लेखापाल शशिकांत मोहिते, नगरसेवक नरेंद्र भद्रापूरे, उदय कदम, नगरसेविका सुनीता पाटील, प्रा. वीणा कापसे, शकुंतला हातरोटे व शशिकला पाटील, पर्यावरणवादी कार्यकर्ते अनंत पाटील, अमोल हातरोटे, विनोद बिलावर, अवधूत केसरकर, चिन्मय देशपांडे, पुंडलिक पाटणे, अल्लाउद्दीन नाईकवाडे, शाम कदम आदी उपस्थित होते.
घराजवळ झाड लावा..!
आपल्या घराजवळ किंवा परिसरात आपल्या आवडीच्या देशी वृक्षांची लागवड करून गडहिंग्लज शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रा. कोरी यांनी यावेळी केले.