सावित्री महिला संस्थेच्या कर्मचाऱ्यांना १५०० पगारवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:17+5:302021-01-22T04:23:17+5:30
चार कोटींची वार्षिक उलाढाल लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील महिला कामगारांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सावित्री महिला ...
चार कोटींची वार्षिक उलाढाल
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील महिला कामगारांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेने अहवाल सालात प्रगती केली. सावित्री महिला संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना १५०० रुपयांची पगारवाढ केल्याची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केली. सुमारे चार कोटींची वार्षिक उलाढाल केल्याचे त्यांनी सांगितले.
वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर यांच्यासह सर्व संचालिका, महिला सभासद उपस्थित होत्या.
अहवाल सालात ४२ लाख रुपयांचा नफा झाला. संस्थेकडे २७ लाखांच्या ठेवी असून, कामगारांना दिवाळीसाठी १० टक्के व गुढीपाडवा सणासाठी पाच टक्के असा १५ टक्के बोनस दिल्याचे अध्यक्षा कोरे यांनी सांगितले.
वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सावित्री औद्योगिक संस्थेने अडचणीच्या काळात नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले.
प्रारंभी संचालिका हेमा बुधाले यांनी प्रास्ताविक केले तर संचालिका सुनीता नाईक यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. सभेपुढील विषयवाचन अकौंट्स अधिकारी मोहन जाधव यांनी केले.
व्यासपीठावर उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर, दूध संघाच्या संचालिका शोभा साखरपे, वारणा कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ.सुरेखा शहापुरे, वाशी शाखेचे जनरल मॅनेजर एस.एम. पाटील, अकौटंस सल्लागार सुधीर कामेरीकर, आर.बी. महाजन, प्रवीण शेलार, प्रकाश पाटील, शरद शेटे, अशोक पाटील, अध्यक्ष रामचंद्र जाधव, लालासो देसाई, श्रीधर बुधाले, अनिल लंबे, एन.ए. पाटील तसेच सावित्री संस्थेच्या सर्व संचालिका, सभासद उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर यांनी आभार मानले. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ..
वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावरील सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सावित्री संस्थेच्या उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर, दूध संघाच्या संचालिका शोभा साखरपे व सर्व संचालिका मंडळ उपस्थित होते.