ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने १५ हजार शेणीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:21+5:302021-05-17T04:23:21+5:30
सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा ...
सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा तसेच बाहेरील रुग्णांचे मृतदेहसुद्धा असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जादा शेणी लागतात.
आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या शेणीदान आवाहनाला प्रतिसाद देत ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनच्या वतीने १५ हजार शेणी कसबा बावडा वैकुंठधाम स्मशानभूमीसाठी देण्यात आल्या.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, ग्रामीण जनसंपर्क प्रमुख बजरंग रणदिवे, हेमंत उलपे, एम. बी. पाटील, विजय पाटील, अतुल पाटील, विलास पाटील, तुषार देसाई (कणेरी), पवन वाठारकर, विनय खोत, रवी घोडके, अक्षय वारके (कणेरीवाडी), अतुल पाटील, अजिंक्य पाटील, निखिल पाटील (नेर्ली) यांच्यासह फौंडेशनचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो
आमदार ऋतुराज पाटील फाउंडेशन कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली यांच्या वतीने १५ हजार शेणी कसबा बावडा वैकुंठ धाम स्मशानभूमीसाठी दान करतेवेळी बजरंग रणदिवे, हेमंत उलपे, अतुल पाटील, अजिंक्य पाटील, एम. बी. पाटील, निखिल पाटील, तुषार देसाई, पवन वाठारकर, विनय खोत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.