कोल्हापूर: माणगांवमध्ये आगीचे सञ सुरूच, १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतकरी भयभयीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:35 PM2022-11-01T17:35:23+5:302022-11-01T17:35:45+5:30

माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची घेतली गंभीर दखल

16 acres of sugarcane on fire in Mangaon Kolhapur district | कोल्हापूर: माणगांवमध्ये आगीचे सञ सुरूच, १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतकरी भयभयीत

संग्रहित फोटो

Next

अभय व्हनवाडे

रूकडी-माणगाव: माणगांव येथील  सरळी नामक शेतातील २५ एकर उसाला रविवारी (दि ३०) आग लागल्याची घटना ताजी असताना आज, मंगळवारी पुन्हा १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले. आगीच्या प्रकारामुळे शेतकरी भयभयीत झाले आहेत. विनाकारण ऊसाना आगी लावण्याच्या सञामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे.

हंगाम सुरु झालेला असतानाच ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यातच अदयाप सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उस कोठे द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यातच परतीच्या पाऊसामुळे जमिनीत ओलावा असल्याने शेतातून ट्रक्टर ट्रॉली बाहेर काढण्यासाठी कसरत सह नुकसानीचे ठरत आहे. कारखाना घोषित  केलेल्या दरामध्ये जळीत उसाला टनामागे ४०० ते ५०० रूपये कमी दर मिळत असल्याने उत्पादकाचे लाखोंचे  नुकसान होत आहे.

दरम्यान, माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने उसतोडीनंतर पाला पेटवून इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार राहणाऱ्या गुन्हेगाराची गोपनीयरीत्या माहिती पोलीस स्टेशनला कळविण्यात येणार आहे. तसेच नुकसान भरपाई मिळावे यासाठी ग्राहक न्यायालय, राज्य वीज नियमक आयोगसह उच्य न्यायालयाकडे नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात येणार असून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. या प्रसिध्दी पञकावर सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदारसह ग्रामपंचायत  सदस्यांच्या सह्या आहेत.

Web Title: 16 acres of sugarcane on fire in Mangaon Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.