पंचगंगा स्मशानभूमीसाठी १६ पिंड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:22+5:302021-03-13T04:42:22+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीसाठी जुना बुधवारपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल सूर्यकांत घाटगे यांनी १६ पिंडी दिल्या. महाशिवरात्रनिमित्त त्यांनी ...

16 objects donated for Panchganga cemetery | पंचगंगा स्मशानभूमीसाठी १६ पिंड भेट

पंचगंगा स्मशानभूमीसाठी १६ पिंड भेट

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीसाठी जुना बुधवारपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल सूर्यकांत घाटगे यांनी १६ पिंडी दिल्या. महाशिवरात्रनिमित्त त्यांनी गुरुवारी पिंडी स्मशानभूमीतील कर्मचा-यांकडे सुपूर्द केल्या. स्मशानभूमीचे अधीक्षक अरविंद कांबळे, पांडुरंग सातपुते, जनार्दन कांबळे, जयदीप कांबळे व यशराज घाटगे उपस्थित होते.

पंचगंगा स्मशानभूमीसाठी नेहमीच सढळ हाताने मदत करण्यासाठी कोल्हापूरकर आघाडीवर असतात. याच ठिकाणी मोफत गॅस दाहिनीही देण्यात आली आहे. केसकर्तनासाठी शेड उभारले आहे. कोरोनामध्ये शेणीचा तुटवडा झाल्याने दानशूर व्यक्तीने शेणीदान मोहीम राबवली. अशा विविध पातळीवर स्मशानभूमीला मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींची धडपड सुरू असते. रक्षाविसर्जनाच्या दिवशीच्या विधीसाठी पिंडची गरज लागते. हे ओळखून राहुल घाटगे यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून १६ पिंडी स्मशानभूमी प्रशासनाला दिल्या.

फोटो : ११०३२०२१ कोल केएमसी स्मशानभूमी न्यूज

ओळी : कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला सामाजिक कार्यकर्ते राहुल घाटगे यांनी गुरुवारी पिंडी दिल्या.

Web Title: 16 objects donated for Panchganga cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.