कृषी यांत्रिकीकरणासाठी विभागातून १६ हजार प्रस्ताव

By admin | Published: May 29, 2017 04:33 PM2017-05-29T16:33:11+5:302017-05-29T16:33:11+5:30

निम्याहून अधिक प्रस्ताव सांगलीतून : लवकरच आॅनलाईन सोडत

16 thousand proposals from the Department for Agricultural Mechanics | कृषी यांत्रिकीकरणासाठी विभागातून १६ हजार प्रस्ताव

कृषी यांत्रिकीकरणासाठी विभागातून १६ हजार प्रस्ताव

Next

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २९: राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानावर शेती औजारे उपलब्ध करून देण्यासाठी ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी’ ही मोहिमेतंर्गत प्रस्ताव मागवले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोल्हापूर विभागातून १६ हजार प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल झाले असून सर्वाधिक सांगली जिल्ह्यातून ८ हजार ८६५ आले आहेत. सोळा हजार प्रस्तावांसाठी सरकारला १३९ कोटी ३१ लाख अपेक्षित अनुदान द्यावे लागणार आहे. प्राप्त प्रस्तावांतून आॅनलाईन पध्दतीने लवकरच सोडत काढून लाभार्थी निवड केली जाणार आहे.

‘उन्नत शेती -समृध्द शेतकरी’ या मोहिमेतंर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांबरोबरच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेती औजारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ट्रॅक्टरसह पंधरा प्रकारची यंत्रे, औजारे दिली जाणार आहेत. यात तांदूळ व डाळीच्या गिरण्यांचाही समावेश आहे. त्यासाठी १५ मे पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यातील ३४ पैकी २८ जिल्ह्यातून १ लाख ८७१ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती जिल्हास्तरावर आॅनलाईन सोडत काढून लाभार्थींची निवड करून मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी ३५ टक्क्यांपासून ६० टक्के तर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी २५ टक्क्यांपासून ५० टक्के अनुदानावर या साहित्यांचे केले जाणार आहे.

दोन जिल्ह्यात मागणीच नाही

शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या या योजनेला वाशिम, गोंदिया या जिल्ह्यातून एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. त्यामुळे या जिल्ह्याचे प्रस्तावित अनुदान इतर जिल्ह्यांना वर्ग केले तर तेवढ्या लाभार्थींची संख्या वाढू शकते.

पुणे विभाग आघाडीवर!

कृषी यांत्रिकीकरणासाठी सर्वात जास्त प्रस्ताव अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल १४ हजार ३६८ तर त्या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातून ११ हजार १७९ दाखल झाले आहेत. त्यामुळे पुणे विभाग आघाडीवर असून ३० हजार ६३३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.

हे मिळणार साहित्य-

ट्रॅक्टर, पॉवरटिलर, कल्टीव्हेटर, खते व बी-टोकण यंत्रे, मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन.

विभागनिहाय प्रस्ताव असे-

विभाग ट्रॅक्टर इतर आजारे औजारे बॅँक एकूण ठाणे १६५ २७१२ - २८७७ नाशिक ७८०८ ७२९४ ११ १५११३ पुणे १४९२७ १५६७३ ३३ ३०६३३ कोल्हापूर ६८४७ ९३४७ ३४ १६२२८ औरंगाबाद ३०८४ ५१५३ ८ ११८४५ लातूर ४०३४ ४८४३ १४ १०९३० अमरावती ३८९४ ४८३४ १७ १००२९ नागूपर १९१ १२०६ - ३२१६ एकूण्- ४१७५० ५१०६२ ११७ १००८७१ प्रवर्गनिहाय दाखल प्रस्ताव - सर्वसाधारण - ८४ हजार ५४४ अनूसूचित जाती-९ हजार ९९७ अनूसूचित जमाती-५ हजार ९६१

Web Title: 16 thousand proposals from the Department for Agricultural Mechanics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.