१६१३ रुग्ण, ५४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:25+5:302021-05-07T04:27:25+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १६१३ रुग्ण ...

1613 patients, 54 deaths | १६१३ रुग्ण, ५४ मृत्यू

१६१३ रुग्ण, ५४ मृत्यू

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १६१३ रुग्ण आढळले असून, ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११०४४ इतकी झाली असून, ७८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरात तब्बल ४०१ रुग्णांची नोंद झाली असून, करवीर तालुक्यात २११ आणि आजरा तालुक्यात ११२ नवे रुग्ण आढळले आहेत. अन्य राज्यांतील आणि जिल्ह्यांतील ११८ रुग्ण असून, एकट्या इचलकरंजीत ८० रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग, बेळगाव, अहमदाबाद येथील आठ रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.

चौकट

मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

इतर जिल्हे ०८

शिवाजीनगर निपाणी, वेंगुर्ला, तवंदी, खरेदीबाग जि. सांगली, आटपाडी, तोरसाेले, किवले पुणे, अहमदाबाद

हातकणंगले ०७

पुलाची शिरोळी २, किणी,वडगाव, कोरोची, नवे पारगाव, रुई

करवीर ०६

सडोली खालसा, निगवे दुमाला, दऱ्याचे वडगाव, नेर्ली, मोरेवाडी, कंदलगाव

गडहिंग्लज ०६

तेरणी, खणदाळ, करंबळी, हसूरवाडी, कुंबनहाल, मगदूम कॉलनी गडहिंग्लज

शिरोळ ०६

कोथळी, चिंचवाड, निमशिरगाव, सिद्धेश्वरवाडी, हेरवाड, शिरोळ, जैनापूर

इचलकरंजी ०५

स्टेशन रोड, शिवाजी सोसायटी, कोले मळा, गणेशनगर, आंबी गल्ली

कोल्हापूर ०५

कसबा बावडा, आपटे नगर, जरगनगर, ताराबाई पार्क, राजारामपुरी

पन्हाळा ०३

वराळे, जेवूर, सातवे

आजरा ०२

बेलेवाडी, करंजेवाडी

भुदरगड ०२

भुदरगड, फये

कागल ०२

चंदगड ०१

तुर्केवाडी

शाहूवाडी ०१

शित्तूर

चौकट

गेल्यावर्षीची शिस्त बिघडली

गेल्यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या काळात तडाखेबंद काम केले होते. मात्र, मधल्या काळात जी रुग्णांची संख्या वाढत गेली, त्यावेळी अनेक उणिवा समोर आल्या. ग्रामपातळीवरच पूर्वीसारखा कडकपणा राहिलेला नाही. परिणामी ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही वाढत आहे.

Web Title: 1613 patients, 54 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.