१६९ कोटींची मागणी गैर

By admin | Published: September 25, 2014 12:48 AM2014-09-25T00:48:51+5:302014-09-25T01:29:09+5:30

हा दावा म्हणजे, ‘२५ कोटींचा दरोडा घालणार होतो; पण प्रत्यक्षात १० लाख रुपयेच मिळाले

169 crore demand is non- | १६९ कोटींची मागणी गैर

१६९ कोटींची मागणी गैर

Next

कोल्हापूर : ‘आयआरबी’ने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे ‘२८ सप्टेंबर २०११ ते १५ जून २०१४ पर्यंत विविध कारणांनी टोलवसुली बंद राहिल्याने १६९ कोटी ५१ लाख रुपयांचा झालेला तोटा भरून द्यावा,’ असा दावा केला आहे. हा दावा म्हणजे, ‘२५ कोटींचा दरोडा घालणार होतो; पण प्रत्यक्षात १० लाख रुपयेच मिळाले,’ असा दरोडेखोराने योजलेला अंदाज आहे, अशा शब्दांत ‘आयआरबी’च्या मागणीची खिल्ली उडविली. टोलवसुलीच बेकायदेशीर आहे; त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच येत नाही, असा दावा अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनी केला. आज, बुधवारी टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात दोघे बोलत होते.
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही राज्य शासन व न्यायालयाने दिलेली टोलवसुलीस स्थगिती, आंदोलन व कायदा सुव्यवस्थेमुळे टोलवसुलीवर झालेला परिणाम यांमुळे टोलवसुलीत १६९ कोटी ५१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. तोट्याची रक्कम तर द्या किंवा या रक मेच्या भरपाईसाठी टोलवसुलीची मुदत तरी वाढवा, अशा आशयाची नोटीस ‘आयआरबी’ने १७ सप्टेंबर २०१४ रोजी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना बजावली आहे. या नोटिसीचा व ‘आयआरबी’च्या मागणीचा एन. डी. पाटील व पानसरे यांनी खरपूस समाचार घेतला.
पानसरे म्हणाले, आयआरबी बेकायदेशीर टोलवसुलीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच बिनबुडाची अवाजवी मागणी करीत आहे. मूल्यांकन समितीच्या अहवालाबाबत कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच टोलची स्थगिती उठवू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती समितीला दिले होते. मात्र, ५ जानेवारी २०१२ रोजी दिलेली स्थगिती परस्परच १३ मे २०१३ रोजी उठविली गेली. दरम्यान, कृती समितीशी ना चर्चा केली, ना मूल्यांकनाचा अहवाल जाहीर केला. कोणत्या कारणावरून स्थगिती दिली व उठविली याचे नेमके उत्तर राज्य शासनाकडे नाही. त्यामुळे कोणीही, कितीही नुकसानीचा कांगावा केला तरी कोल्हापूरकरांना विचार करण्याची गरज नाही. मूल्यांकनाचा अहवाल कोल्हापूरच्या बाजूने असल्यानेच तो लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)

गांधी जयंतीदिवशी टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’
टोलविरोधी कृती समितीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. कृती समितीच्या व्यासपीठाचा राजकीय वापर न करता निवडणूक काळातही टोल आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आज, बुधवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. २ आॅक्टोबरला गांधीजयंती दिवशी फुलेवाडी, शिये, शिरोली व शाहू या टोलनाक्यांवर सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्याची घोषणा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी यावेळी केली. मेळाव्यात कृती समितीची निवडणूक काळातील आंदोलनाची दिशा ठरल्याने प्रचाराच्या मुद्द्यावर पडदा पडला आहे.
राजारामपुरीतील अप्पाज कॉम्प्लेक्स येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा निवडणूक काळात आंदोलन सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मेळावा झाला. यावेळी वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.
पानसरे म्हणाले, येत्या सोमवारी (दि. २९) टोलबाबतचा सर्वाेच्च न्यायालयात काहीही निकाल लागो. कोल्हापूरकर टोल देणार नाहीत.

Web Title: 169 crore demand is non-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.