करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यात सोळा कोटीचे दागिने, जून २०१८ अखेर मूल्याकंन पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:57 PM2018-07-09T16:57:25+5:302018-07-09T17:01:27+5:30
श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जून २०१८ अखेर बारा कोटी २१ लाख २२ हजाराचे सोन्याचे तर ३ क ोटी ८८ लाख १३ हजार किंमतीचे चांदीचे असे १६ कोटी ९ लाख ३६ हजार रूपयांचे दागिने आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जून २०१८ अखेर बारा कोटी २१ लाख २२ हजाराचे सोन्याचे तर ३ क ोटी ८८ लाख १३ हजार किंमतीचे चांदीचे असे १६ कोटी ९ लाख ३६ हजार रूपयांचे दागिने आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
महेश जाधव म्हणाले, अंबाबाई व ज्योतिबा देवस्थानकडे भक्तांनी दिलेल्या दागिन्यांचे दरवर्षी जून, जूलै महिन्यात मूल्याकंन करण्यात येते. त्यानुसार २०१७-१८ मध्ये व एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत अर्पण केलेल्या दागिन्यांचे मूल्याकंन २७ जून ते ४ जूलै २०१८ या कालावधीत करण्यात आले.
२०१७-१८ मध्ये अंबाबाईच्या खजिन्यात २६२६.८८० ग्रॅम सोने, ३४४०६.३७० ग्रॅम चांदी असे ९३ लाख ८८ हजार ९९६ रूपये किंमतीचे दागिने जमा झाले आहे. ज्योतिबा देवस्थानला ४४६.१० ग्रॅम सोने व ४८२७१.१०० ग्रॅम चांदी असे ३२ लाख १३ हजार ५९७ रूपये किंमतीचे दागिने जमा झाले.
एप्रिल ते जून २०१८ पर्यंत अंबाबाईला ८८८.३३० ग्रॅम सोने व ५४०९ ग्रॅम चांदीचे दागिने जमा झाल्याचे महेश जाधव यांनी सांगितले. खजिन्यात तीनशे-चारशे वर्षापुर्वीचे अनेक मौल्यवान दागिने आहेत, विधी व न्याय विभागाची परवानी घेऊन लवकरच त्याचेही मूल्याकन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, सहायक सचिव शिवाजी साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते.