कुरुंदवाडला १७ जागा : ६५ उमेदवार
By Admin | Published: November 11, 2016 11:51 PM2016-11-11T23:51:21+5:302016-11-11T23:51:21+5:30
नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार : ३८ जणांची माघार, चौरंगी लढतीचे चित्र
कुरुंदवाड : येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ३८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ६, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ६५ उमेदवार रिंंगणात उतरले आहेत.
नगराध्यक्षपदाच्या प्रमुख शर्यतीतून हुमायून मिरासो महात तर प्रभाग १ मधून राजेंद्र परशराम बेले या दोन्ही शिवसैनिक उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना अशी चौरंगी लढत लागली असली तरी शिवसेनेची अगदी मोजक्या प्रभागातच उमेदवारी असल्याने खरी लढत तिरंगीच होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एमआयएम ही उतरली असल्याने या पदासाठी बहुरंगी लढत होत आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी असल्याने चुरशीची होत आहे.
नगरसेवकपदासाठी १२७ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत ६१ जणांनी माघार घेतल्याने एकूण ६५ उमेदवार रिंंगणात उतरले आहेत.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
जयराम कृष्णराव पाटील (राष्ट्रीय काँग्रेस), दादगोंडा आप्पासो पाटील (राष्ट्रवादी), रामचंद्र भाऊसो डांगे (भाजप), सुनिल बळवंत कुरुंदवाडे (एमआयएम), आप्पासो आण्णाप्पा बंडगर (अपक्ष), नजीर मकबुल मोमीन (अपक्ष).