पूरग्रस्त भागातील आठ हजार व्यापाऱ्यांचे १७०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:40+5:302021-07-29T04:25:40+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात आलेल्या महापुरामध्ये हजारो कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो व्यापाऱ्यांचे ...

1,700 crore loss to 8,000 traders in flood-hit areas | पूरग्रस्त भागातील आठ हजार व्यापाऱ्यांचे १७०० कोटींचे नुकसान

पूरग्रस्त भागातील आठ हजार व्यापाऱ्यांचे १७०० कोटींचे नुकसान

Next

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात आलेल्या महापुरामध्ये हजारो कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो व्यापाऱ्यांचे सर्वस्व नष्ट झाले आहे. अशा व्यापाऱ्यांना सरकारने तत्काळ नुकसानभरपाई देऊन, पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

समाजातील सर्वच घटक महापुराच्या संकटात सापडले आहेत. अशा घटकांना अन्य सुस्थितीतील व्यापारी व उद्योजक मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहेत. पुराच्या कालखंडात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, व्यापाऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. ‘महाराष्ट्र चेंबर’ तर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये या सहा जिल्ह्यातील सुमारे आठ हजार व्यापाऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे. त्यांच्या आरंभिक नुकसानीचा आकडा १७०० कोटी रुपये आहे. ‘महाराष्ट्र चेंबर’चे पदाधिकारी लवकरच पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व व्यापारी उद्योजक यांच्या नुकसानीची माहिती घेऊन समाजाच्या स्तरावर होऊ शकणारी मदत आणि सरकारकडून नुकसानभरपाई व मदत मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे पाठपुरावा करणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.

Web Title: 1,700 crore loss to 8,000 traders in flood-hit areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.