विनापरवाना १७ हजारांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:14+5:302020-12-12T04:41:14+5:30

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने शुक्रवारी विनापरवाना दारूची वाहतूक़ आणि ओपन बार अशा शहरात दोन ठिकाणी कारवाया ...

17,000 worth of liquor seized without license | विनापरवाना १७ हजारांची दारू पकडली

विनापरवाना १७ हजारांची दारू पकडली

Next

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने शुक्रवारी विनापरवाना दारूची वाहतूक़ आणि ओपन बार अशा शहरात दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. या प्रकरणी अजिंक्‍य धनाजी तिबिले (वय २७, रा. भैरव गल्‍ली, वरणगे, करवीर) व अभिजित मोरे (रा. राधानगरी) या दोघांवर अनुक्रमे करवीर व जुना राजवाडा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

अनलॉकनंतर जिल्ह्यामध्ये विनापरवाना दारू वाहतूक आणि ओपन बारचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी पोलिसांकडेही वारंवार तक्ररी येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. अशाच प्रकारे शुक्रवारी निटवडे (ता. करवीर) येथे केलेल्या कारवाईमध्ये अजिंक्‍य तिबिले याच्‍याजवळ देशी दारूच्‍या १९२ बाटल्‍या व विदेशी दारूच्‍या ३६ बाटल्‍या असा सुमारे १३ हजार ७२८ रुपयांचा माल मिळून आला. शहरातील निर्माण चौकातून दारू घेऊन जाणाऱ्या अभिजित मोरे यालाही पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे विनपरवाना चार हजार ९०० रुपयांची दारू सापडली. लक्ष्‍मीपुरी पोलिसांनीही हद्दीतील खुल्‍या जागांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर रात्री उशिरा कारवाई केली. याची नोंद करण्‍याचे काम पोलीस ठाण्‍यात सुरू होते.

बातमीदार : विनोद

Web Title: 17,000 worth of liquor seized without license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.