शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील रस्त्यांसाठी १८ कोटी ४१ लाखांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:15+5:302021-04-05T04:22:15+5:30
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३१ कोटी ३० लाखांवर निधी मंजूर झाला आहे. त्यातील तब्बल १८ कोटी ४१ लाख ...
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३१ कोटी ३० लाखांवर निधी मंजूर झाला आहे. त्यातील तब्बल १८ कोटी ४१ लाख रुपये इतका निधी आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी-पन्हाळ्यासाठी खेचून आणला आहे. काही दिवसांपूर्वीच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पामध्ये आमदार कोरे यांनी सुमारे ६६ कोटी रुपयांचा मोठा निधी विविध रस्त्यांसाठी मंजूर करून आणला होता. लवकरच या कामांनादेखील प्रारंभ होणार आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील साळशी, सुपात्रे ते वरेवाडी रस्ता सुधारणा करणे (३ कोटी २ लाख), अमेणी, कारंडेवाडी ते करगुळे रस्ता सुधारणा करणे (५ कोटी ३६ लाख २२ हजार ), करंजोशी ते अरूळ, आबार्ड, शिराळेतर्फे मलकापूर ते पंणुत्रे रस्ता सुधारणा करणे (३ कोटी २६ लाख २५ हजार ), पेरीड, कडवे, मधलीवाडी ते करंगुळे रस्ता सुधारणा (४ कोटी ५७ लाख ४ हजार ), माले, पोखले, बहिरेवाडी ते राष्ट्रीय मार्ग रस्ता जोडणे व रस्ता सुधारणा करणे (२ कोटी १९ लाख ६४ हजार रुपये ),
.............................
चौकट-
जिल्ह्यात १८ कोटी ४१ लाख फक्त पन्हाळा - शाहूवाडीसाठी
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३१ कोटी ३० लाख विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला. त्यातील १८ कोटी ४१ लाख रुपयांची मंजुरी शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यासाठी मिळाली आहे. जिल्ह्यात आमदार कोरे यांनी सर्वाधिक निधी खेचून आणण्यात यश मिळविले.