दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांसाठी १८ कोटींचा निधी ऋतुराज पाटील यांचा पाठपुरावा : गावांत होणार विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:37+5:302021-03-19T04:22:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १७ कोटी ९५ लाख ...

18 crore fund for roads in southern constituency Rituraj Patil's follow up: Development work will be done in the village | दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांसाठी १८ कोटींचा निधी ऋतुराज पाटील यांचा पाठपुरावा : गावांत होणार विकासकामे

दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांसाठी १८ कोटींचा निधी ऋतुराज पाटील यांचा पाठपुरावा : गावांत होणार विकासकामे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या निधीतून रस्ते, गटर्स व इतर कामे करण्यात येणार आहेत. निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ही कामे होणार..

१.कोल्हापूर कळंबे तर्फ ठाणे, इस्पुर्ली, शेळेवाडी रस्ता सुधारणा - ५ कोटी

२. विकासवाडी नेर्ली तामगाव उजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी वसगडे लांबोरे मळा, विमानतळ ते मणेरमळा रस्ता व आरसीसी गटर्स व रुंदीकरणासह रस्ता सुधारणा - २ कोटी ५० लाख.

३.पट्टणकोडोली हुपरी रेंदाळ जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत, उचगाव पूल ते मुडशिंगी कमान रस्ता सुधारणा - २ कोटी ५० लाख.

४.कोल्हापूर शहराबाहेरील वळण रस्ता शाहू नाका, कळंबा, साळोखेनगर, बालिंगे शिंगणापूर, चिखली, वडणगे, निगवे दुमाला, शिये, टोप ते एमआयडीसी पूल कसबा बावडा शुगरमिल जवळून कदमवाडी मार्केट यार्ड ताराराणी पुतळा ते शाहू नाका उजळाईवाडी ते विमानतळ रस्ता सुधारणा व आरसीसी गटर्स -२ कोटी.

५.आयटीआय, पाचगाव, गिरगाव, वडगाव, नंदगाव, खेबवडे ते बाचणी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा- २ कोटी.

६.चंद्रे, निगवे खालसा, कावणे, चुये, वडकशिवाले, इस्पूर्ली, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगाव, कोगील, कणेरी, नेर्ली, हलसवडे, पट्टणकोडोली, कोगील बुद्रूक गावाजवळ आरसीसी गटर्स व काँक्रीटीकरण - १ कोटी.

७.कात्यायनी मंदिर, दऱ्याचे वडगाव, सिद्धनेर्ली बंदिस्त गटर्स - ६० लाख.

८.चंद्रे, निगवे खालसा, कावणे, चुये, वडकशिवाले, इस्पुर्ली, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगाव, कोगील, कणेरी, गोकुळ शिरगाव, नेर्ली पट्टणकोडोली, मोरी बांधकाम व संरक्षक भिंत बांधकाम : ५० लाख.

Web Title: 18 crore fund for roads in southern constituency Rituraj Patil's follow up: Development work will be done in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.