तिघा सराईतांकडून १८ प्राणघातक शस्त्रे जप्त

By सचिन भोसले | Published: November 10, 2023 07:43 PM2023-11-10T19:43:58+5:302023-11-10T19:44:05+5:30

विशेष गुन्हे शोध मोहीमेत पोलिसांची संयुक्त कारवाई : दोघांना अटक

18 deadly weapons seized from three goons | तिघा सराईतांकडून १८ प्राणघातक शस्त्रे जप्त

तिघा सराईतांकडून १८ प्राणघातक शस्त्रे जप्त

कोल्हापूर : राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरनगरात शहरातील सर्व पोलिस ठाणी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रभारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री विशेष गुन्हे शोध मोहीम राबवून सराईत गुन्हेगारांकडून १८ प्राणघातक शस्त्रे जप्त करीत दोघा सराईतांना अटक केली. तर एक संशयित हाती लागला नाही. राहूल संतोष घोलप (वय १९, रा. दत्तमंदीर लगत राजेंद्रनगर), सोहेल महमंद हुसेन मलबारी (वय ३०, रा. सिरत मोहल्ला मशीदजवळ, सुभाषनगर), गुरुदत्त शांतीनाथ पोळ ( रा. बिजली चौक, जवाहरनगर) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष गुन्हे शोध मोहीम राबविण्याची सुचना दिली होती. विशेष करून लाॅजेस, हाॅटेल्स, बिअर पाहीजे, फरारी, रेकाॅर्डवरील गुन्हेगार, यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार पोलिस उपअधिक्षक अजित टिके यांनी राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुुरी, लक्ष्मीपुरी ठाण्यातील प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुक्रवारी उशिरा रात्री कार्यालयात बोलावले. त्यात राजारामपुरी हद्दीतील राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, विक्रमनगर या संवेदनशील परिसरात गुन्हे शोध मोहीम राबविण्याची सुचना दिली. त्यात प्रथम राजेंद्रनगरात ही मोहीम राबविली.

त्यात संशयित संतोष घोलप यांच्या कब्जात असलेली ३ हजार ५०० रूपये किंमतीची १२ हत्यारे, त्यात एडका, तलवारी, चाकू, कोयता अशी धारदार शस्त्रे जप्त करून त्यालाही ताब्यात घेतले. त्यानंतर सुभाषनगरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोहेल मलाबारी यांच्या ताब्यातील दुचाकी व एक मोठा कोयता असे एकूण ७० हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यालाही अटक केली. त्यानंतर जवाहरनगरात रबाविलेल्या शोध मोहीमेत गुरुदत्त पोळ यांचे स्क्रॅप दुकानात एडका, तलवार, चाकू, कोयता अशी एकूण ६ धारदार शस्त्रे आढळली, ती जप्त करण्यात आली . मात्र, संशयित गुरुदत्त हा तेथे सापडला नाही या मोहीमेत अपर पोलिस अधीक्षक जयश्री जाधव, शहर उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, सतीशकुमार गुरव, अजय सिंदकर, अविनाश कवठेकर आदी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

 

Web Title: 18 deadly weapons seized from three goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.