एफआरपी थकविणारे १८ कारखाने रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:29 AM2019-04-26T00:29:50+5:302019-04-26T00:29:55+5:30

कोल्हापूर : वारंवार नोटिसा पाठवून, मुदतवाढ देऊनही साखर कारखानदार जुमानत नसल्याने अखेर साखर आयुक्तांनी निवडणूक संपल्यावर लागलीच कारवाईचा धडाका ...

18 factory FRP tired radars | एफआरपी थकविणारे १८ कारखाने रडारवर

एफआरपी थकविणारे १८ कारखाने रडारवर

Next

कोल्हापूर : वारंवार नोटिसा पाठवून, मुदतवाढ देऊनही साखर कारखानदार जुमानत नसल्याने अखेर साखर आयुक्तांनी निवडणूक संपल्यावर लागलीच कारवाईचा धडाका सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना आरआरसीअंतर्गत साखर जप्तीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, नोटिसा तयार ठेवल्या आहेत.
जिल्ह्यातील २२ पैकी १८ कारखाने या कारवाईअंतर्गत आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीतून विश्रांती मिळत नाही तोवर साखरजप्तीच्या कारवाईची कुºहाड कोसळणार असल्याने साखर उद्योग हबकला आहे.
ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार ऊस तुटल्याच्या आत १०० टक्के एफआरपी देय असतानाही साखरेला दर व मागणी नसल्यामुळे पैसा नसल्याचे सांगत साखर कारखानदारांनी ८० : २० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे बिले अदा केली आहेत. प्रत्येक कारखान्याकडून अजून प्रतिटन किमान ५०० रुपये थकीत आहेत. ही एफआरपी अदा करावी याबाबत पुणे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पदभार घेतल्यापासून सातत्याने कारखानदारांना लेखी सूचना दिल्या आहेत; पण जिल्ह्यातील चार कारखान्यांचा अपवाद वगळता याकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेले नाही.
३० मार्चपर्यंत थकित एफआरपी द्या, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्याचेही पालन झाले नाही. दरम्यान, या कालावधीत लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि निवडणूक कामात यंत्रणा अडकल्याने कारवाईच्या बाबतीतील निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. बुधवारी (दि. २४) आचारसंहिता शिथिल झाल्यावर लगेच आयुक्तांकडून थकीत एफआरपीचा अहवाल मागवून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

१०० टक्के एफआरपी दिलेले कारखाने
सरसेनापती संताजी घोरपडे (सेनापती कापशी), हेमरस शुगर्स (राजगोळी) या दोन कारखान्यांनी अनुक्रमे १८४ कोटी ७९ लाख व १९० कोटींची १०० टक्के एफआरपी उत्पादकांना सर्वांत
प्रथम अदा केली आहे.
डी. वाय. पाटील (गगनबावडा), दूधगंगा (बिद्री) या दोन कारखान्यांनी अनुक्रमे १५ कोटी
२४ लाख व ३० कोटी ८१ लाखांची रक्कम मागील आठवड्यात खात्यावर जमा केली आहे.


कारखाना दिलेली शिल्लक
आजरा ७२ १५.४६
भोगावती ८८.५० २५.८१
राजाराम ११२.७८ ०४.३९
शाहू १९८ ३३.००
दत्त ३०७.२४ ३७.४३
बिद्री १८६.१९ ——
गडहिंग्लज ६६.१४ १०.८२
जवाहर ४२१.२४ ९१.१४
मंडलिक ११२.५८ २३.०७
कुंभी ११९.७३ ३९.४३
पंचगंगा १४०.३९ ६५.४१
कारखाना दिलेली शिल्लक
शरद १५७.९६ १८.९३
वारणा ११२.४२ १४९.२२
गायकवाड ५७.७१ १०.४३
डी. वाय. ८७.१२ ——
दालमिया २२५.६१ ४२.३५
गुरुदत्त १६१.६६ ६२.०२
इको केन ४५.७४ ०९.९७
हेमरस १९०.०० ——
महाडिक ४८.७१ १०.७०
घोरपडे १८४.७९ ——
तांबाळे ५७.८९ ५.३५

Web Title: 18 factory FRP tired radars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.