कोल्हापूर जिल्ह्यात मतदार वाढले, कोणत्या तालुक्यात किती मतदार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 05:23 PM2024-08-07T17:23:56+5:302024-08-07T17:24:34+5:30
वाढलेल्या मतदारांत महिला अधिक
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत जिल्ह्यात १८ हजार २०६ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. एका मतदान केंद्रावर १३५० मतदार या निकषानुसार ९१ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघात प्रत्येकी दोन हजारांवर मतदार वाढले आहेत. ही मते फारच महत्त्वाची मानली जातात.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी प्रारूप मतदार यादीची माहिती दिली. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार पुनरिक्षण उपक्रम राबविण्यात येत असून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. नागरिकांनी त्यात आपले नाव व संबंधित माहिती योग्य आहे का, याची तपासणी करावी. मतदार यादीवर २० तारखेपर्यंत दावे हरकती स्वीकारल्या जातील. त्या २९ तारखेपर्यंत निकाली काढण्यात येतील. अंतिम मतदारयादी ३० तारखेला प्रसिद्ध होणार आहे. या कालावधीत १० व ११ तसेच १७ व १८ तारखेला विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम होणार असून बीएलओंमार्फत मतदान केंद्रांवर नोंदणी केली जाईल. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.
वाढलेल्या मतदारांत महिला अधिक
गेल्या तीन महिन्यात वाढलेल्या मतदारांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत १ हजार ६७८ ने जास्त आहे. तृतीयपंथी मतदारांमध्ये फक्त ४ ने वाढ झाली आहे.
१ हजार १७४ नावे वगळली
लोकसभेनंतर मृत्यू, दुबार नोंदणी, स्थलांतर अशा विविध कारणांनी १ हजार १७४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये ६३७ पुरुष व ५३७ महिलांचा समावेश आहे.
मतदान केंद्रांची माहिती अशी
मूळ मतदान केंद्रे : ३ हजार ३५९
केंद्राच्या ठिकाणात बदल : १०१
मतदान केंद्राच्या नावात बदल : २९
नवीन मतदान केंद्र संख्या : ९१
मतदारांचे विलीनीकरण केलेल्या केंद्रांची संख्या : १७८
एकूण मतदान केंद्रे : ३ हजार४५०
वाढलेले मतदार असे
मतदारसंघ : पुरुष : स्त्री : एकूण
हातकणंगले : १ हजार १२८ : १ हजार ५९६ : २ हजार ७२५
कोल्हापूर दक्षिण : १ हजार २६२ : १ हजार ४५३ : २ हजार ७१५
शिरोळ : १ हजार ००३ : १ हजार ४१९ : २ हजार ४२२
राधानगरी : ८५१ : ९२५ : १ हजार ७७६
इचलकरंजी : ७७४ : ९११ : १ हजार ६८५
कोल्हापूर उत्तर : ७८८ : ८९१ : १ हजार ६८०
करवीर : ७४१ : ८७८ : १ हजार ६१९
शाहूवाडी : ७०१ : ७०२ : १ हजार ४०४
कागल : ५२८ : ५८४ : १ हजार ११२
चंदगड : ४८६ : ५८१ : १ हजार ०६८
एकूण : ८ हजार २६२ : ९ हजार ९४० : १८ हजार २०६
एकूण मतदार संख्या
मतदार संघ : पुरुष : स्त्री : तृतीयपंथी : एकूण
चंदगड : १ लाख ६० हजार ०८४ : १ लाख ५८ हजार ४९९ : ८ : ३ लाख १८ हजार ५९१
राधानगरी : १ लाख ७३ हजार ८०९ : १ लाख ६१ हजार ८४२ : १४ : ३ लाख ३५ हजार ६६५
कागल : १ लाख ६६ हजार १८७ : १ लाख ६४ हजार ३८३ : ४ : ३ लाख ३० हजार ५७४
कोल्हापूर दक्षिण : १ लाख ७९ हजार २८५ : १लाख ७३ हजार १८६ : ४७ : ३ लाख ५२ हजार ५१८
करवीर : १ लाख ६३ हजार २९४ : १ लाख ५० हजार ७०७ : ० : ३ लाख १४ हजार ६३१
कोल्हापूर उत्तर : १ लाख ४६ हजार ११६ : १ लाख ४८ हजार २९३ : १८ : २ लाख ९४ हजार ४२७
शाहूवाडी : १ लाख ५३ हजार ४९३ : १ लाख ४३ हजार ३३२ : ६ : २ लाख ९६ हजार ८३१
हातकणंगले : १ लाख ७० हजार ६२९ : १ लाख ६३ हजार ५४१ : १९ : ३ लाख ३४ हजार १८९
इचलकरंजी : १ लाख ५४ हजार ७४७ : २ लाख ४७ हजार ५८१ : ६० : ३ लाख २हजार ३८८
शिरोळ : १ लाख ५९ हजार ८०८ : १ लाख ६० हजार ०४० : ३ : ३ लाख १९ हजार ८५१
एकूण : १६ लाख २८ हजार ०८२ : १५ लाख ७१ हजार ४०४ : १७९ : ३१ लाख ९९ हजार ६६५