विश्वासार्ह रुग्णसेवेची १८ वर्षे : डी. वाय. हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:12+5:302021-06-09T04:32:12+5:30

: समाजातील सर्व घटकांपर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डॉ. ...

18 years of reliable patient care: d. Y. Hospital | विश्वासार्ह रुग्णसेवेची १८ वर्षे : डी. वाय. हॉस्पिटल

विश्वासार्ह रुग्णसेवेची १८ वर्षे : डी. वाय. हॉस्पिटल

Next

: समाजातील सर्व घटकांपर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने मंगळवारी १९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या १८ वर्षांत आपल्या विश्वासार्ह सेवेमुळे कोल्हापूर व आसपासच्या परिसरातील लोकांसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे आरोग्यसेवेसाठीचे हक्काचे ठिकाण बनले आहे.

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून हे हॉस्पिटल यशाचे नवनवे टप्पे पार करीत आहे. कसबा बावडा येथील मेडिकल कॉलेजच्या परिसरात सुरुवातीला १०० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा विस्तार करताना २००१ पासून कदमवाडी येथे सुसज्ज हॉस्पिटल उभारणीचे काम डॉ. संजय पाटील यांनी हाती घेतले. २००३ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते ३०० बेडच्या या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीतून व रुग्णांच्या वाढत्या पाठबळावर ५०० बेडच्या व त्यानंतर ७५० बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले.

सर्व वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून हॉस्पिटलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांचे या कामात मोठे सहकार्य लाभत आहे. गेल्या १८ वर्षांत अतिशय चांगली व विनम्र रुग्णसेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून दिली जात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे आजपर्यंत कोणालाही उपचारापासून वंचित ठेवले नाही. गरीब रुग्णांवर मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार केले जातात. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी हॉस्पिटलच्या कामाचे कौतुक केले असून, कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अभिनंदन केले होते. ISO ९००१:2005 प्रमाणपत्रासह अनेक सन्मान हॉस्पिटलने मिळविले आहेत.

चौकट : चौकट : एनएबीएच अधिस्वीकृती

रुग्णाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील अशा अनेक सोयीसुविधा, नवे तंत्रज्ञान आपल्या हॉस्पिटलमध्येही असावे यासाठी डॉ. संजय. डी. पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो. भारतीय वैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था 'एनएबीएच'नेही हॉस्पिटलच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले असून, नुकतीच हॉस्पिटलला अधिस्वीकृती दिली आहे.

चौकट :

कोविड रुग्णासाठी सेवा

गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलने सरकारी यंत्रणेच्या बरोबरीने रुग्णसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्राद्वारे हॉस्पिटलच्या कामाचे कौतुक केले होते. कोरोनाचे निदान जलद होऊन त्वरित उपचार मिळावेत यासाठी हॉस्पिटलने एनएबीएल मान्यताप्राप्त अत्याधुनिक मोलॅक्युलर लॅबची उभारणी केली असून, त्याचा मोठा फायदा कोल्हापूरकरांना होत आहे.

चौकट : अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब

वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व डॉक्टरांसाठीही उपयुक्त ठरणाऱ्या अत्याधुनिक सिम्युलेशन लॅबची हॉस्पिटलने उभारणी केली आहे. हॉस्पिटलमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा पुरविल्या जातात. आधुनिक यंत्रसामग्रीबरोबरच रुग्ण देखरेखीची प्रगत व्यवस्था व त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवा, ट्रामा टीमसह अनेक सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर क्रिटिकल केअरसाठी आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू सेवा दिली जाते. हॉस्पिटलच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांमध्ये आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून रोगनिदान झालेल्यांना सवलतीच्या दरात उपचार दिले जातात. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह विविध योजनांचा फायदा रुग्णांना होण्यासाठी प्रयत्न केला जातो.

कोट :

रुग्ण व नातेवाइकांचे भक्कम पाठबळ, विश्वास व आशीर्वादाच्या बळावर आज डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल १९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यापुढेही रुग्णसेवेचे हे व्रत अधिक जोमाने सुरू राहणार असून, अनेक आधुनिक सोयीसुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून पुरविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

डॉ. संजय डी. पाटील

कुलपती डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ

Web Title: 18 years of reliable patient care: d. Y. Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.