कोल्हापुरात लक्ष्मीपुरी बाजारात रिक्षातून १८ हजारांची रोकड लंपास

By उद्धव गोडसे | Published: May 7, 2023 05:16 PM2023-05-07T17:16:47+5:302023-05-07T17:18:27+5:30

याबाबत रिक्षाचालक जीतेंद्र संभाजी शिंदे (वय ५०, रा. अनुकामिनी मंदिर, टाकाळा, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

18,000 cash looted from a rickshaw in Laxmipuri market in Kolhapur | कोल्हापुरात लक्ष्मीपुरी बाजारात रिक्षातून १८ हजारांची रोकड लंपास

कोल्हापुरात लक्ष्मीपुरी बाजारात रिक्षातून १८ हजारांची रोकड लंपास

googlenewsNext

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजारपेठेत रस्त्याकडेला पार्क केलेल्या रिक्षाच्या लॉकरमधील १८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. हा प्रकार रविवारी (दि. ७) दुपारी बाराच्या सुमारास घडला. याबाबत रिक्षाचालक जीतेंद्र संभाजी शिंदे (वय ५०, रा. अनुकामिनी मंदिर, टाकाळा, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी शिंदे हे रविवारी दुपारी लक्ष्मीपुरीतील बाजारात गेले होते. मिरची विक्रीच्या दुकानाजवळ रिक्षा पार्क करून ते चिकन आणण्यासाठी गेले. भाज्या आणि चिकन घेऊन घरी पोहोचल्यानंतर त्यांना रिक्षातील लॉकर उघडे असल्याचे दिसले. लॉकरमधील १८ हजार रुपयांची रोकड कोणीतरी पळविल्याचे लक्षात येताच त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. शिंदे यांनी आर.के. नगर येथे बांधलेल्या नवीन घराची वास्तूशांती पुढील आठवड्यात आहे. त्यामुळे खरेदीसाठी लागणारी काही रक्कम त्यांनी रिक्षातील लॉकरमध्ये ठेवली होती. शिंदे यांच्या पाच रिक्षा असून, कोरोना काळात त्यांनी मोफत रिक्षा चालवून प्रशासनाला मदत केली होती.
 

Web Title: 18,000 cash looted from a rickshaw in Laxmipuri market in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.