जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १९ कोटींचा निधी मंजूर, पालकमंत्र्यांचा पाठपुरावा : गटर्स, लहान पुलांचीही कामे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:03+5:302021-03-19T04:23:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १९ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १९ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या निधीतून रस्ते, गटर्स व लहान पुलांची कामे करण्यात येणार आहेत. यातून करण्यात येणाऱ्या कामामध्ये करवीर, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या सर्व कामांची लवकरच सुरुवात होऊन चांगल्या दर्जाची व वेळेत कामे होतील, यासाठी दक्षता घेणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
१. कळंबे तर्फ ठाणे इस्पुर्ली शेळेवाडी रस्ता सुधारणा - ५ कोटी
२. करवीर तालुक्यातील केर्ली, वाडी रत्नागिरी, गिरोली रस्ता सुधारणा -३ कोटी.
३.कोल्हापूर जिल्ह्यातील विजयदुर्ग तलेरा गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली हुपरी रेंदाळ जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंतची सुधारणा करणे एमएसईबी ते सांगवडे फाटा : २ कोटी ५० लाख
४. करवीर तालुक्यातील केर्लीवाडी रत्नागिरी, गिरोली रस्ता रूंदीकरणासह सुधारणा - १ कोटी ५० लाख.
५. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कळंबे तर्फ ठाणे पाचगाव भारती विद्यापीठ कंदलगाव कोगील खुर्द सिध्दगिरी हॉस्पिटल, कोगील बुद्रुक रस्ता व बंदीस्त आरसीसी गटर्स बांधणे -१ कोटी २५ लाख.
६.पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ सुळे कोदवडे वेतवडे म्हासुर्ली, सुळे ते खामनेवाडी मजबुतीकरण व रुंदीकरण -१ कोटी.
७. गगनबावडा तालुक्यातील अणदुर, मांडुकली, मणदूर, वेतवडे, बालेवाडी तांदूळवाडी रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण -१ कोटी.
८.गगनबावडा तालुक्यातील परखंदळे गोठे आकुर्डे गारीवडे, खेरीवडे ते जर्गी रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण -९० लाख.
९. पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, गोठे, आकुर्डे गारीवडे, गोठे ते आकुर्डे रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण - ८५ लाख.
१०. गगनबावडा तालुक्यातील निवडे वेसर्डे असंडोली कोदे, साळवण बाजारपेठ ते वेसर्डे रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण - ७५ लाख
११.गगनबावडा तालुक्यातील शेणवडे अणदुर धुंदवडे लहान पुलाचे बांधकाम- ६० लाख.
१२. पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, गोठे, आकुर्डे, गारीवडे गगनबावडा रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण- ५० लाख.
१३.गगनबावडा तालुक्यातील परखंदळे, गोठे, आकुर्डे, गारीवडे, धुंदवडे ते चौधरवाडी रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण - ४० लाख.