बेळगावात ३ वाजेपर्यंत सरासरी ४६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:33 PM2019-04-23T13:33:43+5:302019-04-23T17:15:57+5:30
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील तीन मतदारसंघात सकाळपासून ११ वाजेपर्यंत अवघे १९ टक्के मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदारांचा कमी उत्साह दिसून आल्यामुळे टक्केवारी कमी दिसत आहे.
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६ टक्के मतदान झाले. बेळगाव जिल्ह्यात मतदार अजूनही निरुत्साही आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान सौंदत्ती मतदारसंघात झाले तर सर्वात कमी बैलहोंगल येथे ३६ टक्के मतदान झाले. सौंदत्तीत ५२ तर बैलहोंगल येथे ३६ टक्के मतदान झाले. सकाळप्रमाणेच शहरात सर्वाधिक तर ग्रामीण भागात कमी मतदान झाले.
- अरभावी : ४८ टक्के
- गोकाक ४९
- बेळगाव उत्तर : ४८
- बेळगाव ग्रामीण : ४५
- बेळगाव दक्षिण : ४0
- बेलहोंगल : ३६
- सौंदत्ती : ५२
- रामदुर्ग : ४९
तृतीयपंथीयांनी केले मतदान
बेळगाव शहरात तीन तृतीयपंथियांनी मतदान केले. २५ वर्षे वयोगटातील हे तीघेही नवमतदार आहेत. मधुने वनविभाग, चंद्रिकाने हलगा तर शगुणने चव्हाट गल्ली मतदान केंद्रात मतदान केले.
दुपारी १ वाजे पर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघात ३५.११ टक्के मतदान झाले. बेळगाव शहरात अधिक तर ग्रामीण भागात कमी मतदान झाले. सकाळपासून ११ वाजेपर्यंत अवघे १९ टक्के मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदारांचा कमी उत्साह दिसून आल्यामुळे टक्केवारी कमी दिसत आहे. सकाळच्या सत्रात मतदारात कमी उत्साह दिसून आलाय. एक पर्यंत सर्वाधिक बेळगाव दक्षिण 39.57 टक्के तर सर्वात कमी बेळगाव ग्रामीण 39.57 टक्के मतदान झाले.
- अरभावी-31.97 टक्के
- गोकाक -35.85 टक्के
- बेळगाव उत्तर - 38.४६ टक्के
- बेळगाव दक्षिण -39.57 टक्के
- बेळगाव ग्रामीण -30.64 टक्के
- बैलहोंगल-36.10 टक्के
- सौन्दत्ती-34.52 टक्के
- रामदुर्ग-33.75 टक्के
बेळगावात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी १९ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदारात कमी उत्साह दिसून आल्यामुळे ही आकडेवारी कमी दिसत आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये २४ टक्के, बेळगाव दक्षिणमध्ये २३ टक्के, बेळगाव ग्रामीणमध्ये १७ टक्के इतके मतदान झाले. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपर्यंत अरभावीत सर्वाधिक १७ टक्के मतदान झाले तर सौन्दत्ती मध्ये अवघे ४.३१ टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले.
निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणीमध्ये पुत्र ज्योतिप्रसाद व बसवप्रसाद यांच्यासह मतदान केले.
अतिशय चुरशीने पार पडत असलेल्या चिकोडी लोकसभा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यन्त २३. ७% मतदान झाले आहे. अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. चिकोडी लोकसभा मतदार संघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. पण हि लढत दुरंगी होत आहे. मतदानात उत्साह दिसत असून नागरिक मतदान केंद्राबाहेर रांगा लावून आहेत.
सकाळी ११ वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान असे (टक्केवारी)
- निपाणी = २३. ४५
- चिकोडी सदलगा = २८.८
- अथणी = २७.१२
- कागवाड= १३.३१
- कुडची = १९.२७
- रायबाग= २५.६८
- हुक्केरी = २३.४८
- यमकनमर्डी= २३.९५