कोल्हापूर हद्दवाढ विरोधात १९ गावे उद्या राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 05:07 PM2024-07-13T17:07:02+5:302024-07-13T17:07:16+5:30

उचगाव : सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी समितीतर्फे १९ गावांनी ग्रामरक्षणासाठी एकजुटीची वज्रमूठ उगारली असून, त्याचाच एक भाग म्हणून या ...

19 villages will remain closed tomorrow against Kolhapur delimitation | कोल्हापूर हद्दवाढ विरोधात १९ गावे उद्या राहणार बंद

कोल्हापूर हद्दवाढ विरोधात १९ गावे उद्या राहणार बंद

उचगाव : सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी समितीतर्फे १९ गावांनी ग्रामरक्षणासाठी एकजुटीची वज्रमूठ उगारली असून, त्याचाच एक भाग म्हणून या गावांमध्ये उद्या, रविवारी (दि. १४ जुलै) कडकडीत बंद पुकारला आहे.

कोल्हापूरच्या हद्दवाढीत पहिल्या टप्प्यात शहराशेजारील काही गावे घेण्याचे नियोजन असल्याचे वृत्त आल्यानंतर उचगाव ग्रामपंचायत येथे बुधवारी (दि. १० जुलै) एल्गार सभा घेण्यात आली. या सभेला १९ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी, महिला उपस्थित होते. सर्वांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हद्दवाढीला विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला होता.

या गावात कडकडीत बंद

उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, शिरोली, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे (कळंबा) या गावासह गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, कंदलगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, वळीवडे, नागाव, शिये, वडणगे, आंबेवाडी, नवे बालिंगा, नागदेववाडी, वाडीपीर, शिंगणापूर, पिरवाडी, शिरोली आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी.

गावागावांत फलक, शांततेचे आवाहन

प्रत्येक गावातील चौकात हद्दवाढविरोधात भव्य डिजिटल फलक लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण गावे शांततेत बंद पाळणार आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास होत आहे. १९ गावांनी शांततेत गाव बंद पाळावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. - मधुकर चव्हाण (सरपंच) अध्यक्ष, सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी समिती

Web Title: 19 villages will remain closed tomorrow against Kolhapur delimitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.