जिल्हा परिषदेच्या ९६६ शाळा तंबाखूमुक्त: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 03:43 PM2019-11-08T15:43:01+5:302019-11-08T15:44:42+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.

19 Zilla Parishad's schools are smoke-free: Collector | जिल्हा परिषदेच्या ९६६ शाळा तंबाखूमुक्त: जिल्हाधिकारी

कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित जिल्हास्तरीय तंबाखू सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या ९६६ शाळा तंबाखूमुक्त: जिल्हाधिकारी उर्वरीत शाळा लवकरच तंबाखूमुक्त करणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या एकूण १९८० पैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखू मुक्त करणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्र्यालयात आयोजित जिल्हास्तरीय तंबाखू सनियंत्रण समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, महापालिका प्रशासन अधिकारी एस. के. यादव, राष्ट्रीय तंबाखू मुक्त कार्यक्रमाच्या समुपदेशक चारुशिला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे, सलाम मुंबई फॉउडेंशनचे रवी कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा पहिल्या टप्यात तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प आहे. दुसऱ्या टप्यात माध्यमिक तसेच अन्य खाजगी शाळा तंबाखू मुक्त करण्यात येतील. तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने निश्चित केलेले ११ निकषांची जिल्ह्यातील सर्व शाळांनी काटेकोरपणे करुन आपली शाळा तंबाखूमुक्त शाळा बनवावी.

चारुशिला कणसे यांनी तंबाखू नियंत्रण कायाद्यातंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. विलास देशमुख यांनी स्वागत केले. क्रांती शिंदे यांनी आभार मानले.

जिल्ह्यातील ९६६ शाळा तंबाखूमुक्त

तंबाखू नियंत्रण कायद्यातंर्गत जिल्हा परिषदेच्या १९८० शाळापैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ६९, भूदरगडमधील ८३, चंदगड मधील १०६, गडहिंग्लजमधील ११९, गगनबावड्यातील ११, हातकणंगलेमधील १४५, कागलमधील ६९, करवीरमधील ७६, पन्हाळामधील ५६, राधानगरीमधील ३०, शाहूवाडीमधील १३८, आणि शिरोळमधील ६३ तंबाखूमुक्त शाळांचा समावेश आहे.

 

 

Web Title: 19 Zilla Parishad's schools are smoke-free: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.