कर्जमाफीसाठी २ लाख ६७ हजार अर्ज--अर्ज भरण्याची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:35 AM2017-09-23T00:35:18+5:302017-09-23T00:35:24+5:30

कोल्हापूर : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता.

 2 lakh 67 thousand application forms for loan waiver | कर्जमाफीसाठी २ लाख ६७ हजार अर्ज--अर्ज भरण्याची मुदत संपली

कर्जमाफीसाठी २ लाख ६७ हजार अर्ज--अर्ज भरण्याची मुदत संपली

Next
ठळक मुद्देसुमारे ५० हजार शेतकºयांनी अर्ज भरलेच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. साधारणत: जिल्ह्यातून सव्वातीन लाख शेतकरी अर्ज दाखल करतील, असा सहकार विभागाचा अंदाज होता.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी २४ जुलैपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यासाठी सहकार विभागाने महा-ई सेवा केंद्रांसह जिल्ह्यात एक हजार केंद्रांमध्ये सोय केली होती. गेले पावणेदोन महिने शेतकºयांनी या माध्यमातून अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारने २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.
जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून शेतकरी पीककर्जाची उचल करतात. सरकारने जाहीर केलेल्या निकषांत बसणाºया शेतकºयांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार असल्याने, पात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन सहकार विभागाने केले होते. साधारणत: थकीत कर्जदार व नियमित परतफेड करणाºया शेतकºयांची संख्या पाहिली तर जिल्ह्णात ३ लाख १७ हजार होते. एवढे आॅनलाईन अर्ज येतील, असे सहकार विभागाला अपेक्षित होते; पण गेल्या पावणेदोन महिन्यांत २ लाख ६७ हजार शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत. साधारणत: ५० हजार शेतकरी अर्ज दाखल करू शकले नाहीत.


सदाभाऊ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार
आॅनलाईन अर्ज भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, या मागणीचा ठराव कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी
(दि. २१) रयत क्रांती संघटनेच्या मेळाव्यात केला होता. या ठरावासह मुख्यमंत्री फडणवीस यांची ते २६ रोजी भेट घेणार आहेत.

मुश्रीफ आज पालकमंत्र्यांची भेट घेणार
नियमित कर्जाची परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी सलग दोन वर्षांच्या कर्जाची जुलै २०१७ पर्यंत परतफेड करणे बंधनकारक होते. यामुळे हजारो शेतकरी अपात्र ठरणार आहेत. याबाबत आमदार हसन मुश्रीफ हे आज, शनिवारी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार आहेत.

आॅनलाईन अर्जांची माहिती जिल्हा बॅँकेने १ ते ६६ नमुन्यांत अद्ययावत करावयाची आहे. त्यानंतर लेखापरीक्षक तपासणी करणार आहेत. आतापर्यंत २८ विकास संस्थांतर्गत २ हजार ५६९ खात्यांची तपासणी केली आहे.

Web Title:  2 lakh 67 thousand application forms for loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.