पावसामुळे एस.टी.च्या ६०७ फेऱ्या रद्द, कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, नऊ मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:25 PM2019-08-02T15:25:57+5:302019-08-02T16:06:23+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने अधिक जोर धरल्याने अनेक मार्गांवर पुराचे पाणी आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एस. टी. बसची वाहतूक काही मार्गांवर बंद करण्यात आली आहे. तीन दिवसांत एस.टी.च्या विविध मार्गांवरील ६०७ फेºया रद्द करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने अधिक जोर धरल्याने अनेक मार्गांवर पुराचे पाणी आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर- गगनबावडा, गडहिंग्लज -नांगनुर, चंदगड- आजरा, कुरूंदवाड -बस्तवाड, दानोळी- कवठेसार, कागल -बस्तवडे, कागल- बाणगे, गगनबावडा- कोल्हापूर आणि आजरा -चंदगड या नऊ मार्गावरील एसटी बसची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
सोमवार (दि. २९ जुलै) पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापुरातील एस.टी. वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषकरून कोकणात जाणाऱ्या मार्गांवर अनेक ठिकाणी पुराचे पाणी आल्याने या मार्गांवरील वाहतूक बंद करून ती अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे. गगनबावडा, रत्नागिरी या मार्गांवरील एस.टी.ची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार बोरपाडळेमार्गे पयार्यी मार्ग चालू आहे. संभाजीनगर- राधानगरी मार्गावर हळदी येथे रस्त्यावर पाणी आल्याने कुर्डू शेळेवाडीमार्गे वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी- कागल- मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने पयार्यी पाचमैल मार्गे वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी-नृसिंहवाडी मार्गावर शिरढोण पुलावर पाणी आल्याने शिरढोणपर्यंत वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी नृसिंहवाडी मार्गावर लाट- हेरवाड पुलावर पाणी आल्याने पयार्यी पाच मैल मार्गे वाहतूक सुरू. गारगोटी-किल्ला पाल मार्गावर रस्ता खराब झाल्याने पयार्यी मालवाडी मार्गे वाहतूक सुरू आहे.मलकापूर -गावडी मार्ग अंशत: बंद आहे. मलकापूर-कोल्हापूर मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार-बोरपाडळेमार्गे वाहतूक सुरू आहे.
कुरूंदवाड-लाट-हेरवाड मार्गावर हेरवाड येथे पुलावर पाणी आल्याने पाच मैलमार्गे वाहतूक सुरू आहे. कुरूंदवाड-टाकळे दानवाड मार्गावर दानवाड ओढ्यावर पाणी आल्याने दत्तवाडमार्गे वाहतूक सुरू आहे. कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती मार्गावर धरणगुत्ती रस्यावर पाणी असल्याने इचलकरंजी/ जयसिंगपूरमार्गे वाहतूक सुरू आहे. कुरूंदवाड-अकिवाट-राजापूर मार्गावर राजापूर पुलावर पाणी आल्याने आकिवाट टाकळीमार्गे वाहतूक सुरू आहे. कागल- इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने हुपरीपर्यंत वाहतूक सुरू आहे. राधानगरी- काटीवडे मार्गावर पुलावर पाणी असल्याने पयार्यी गुडाळमार्गे वाहतूक सुरू आहे.
.
कोल्हापूर शहरातून पुणे, सांगली, सातारा, निपाणी, गडहिंग्लज, बेळगाव, गारगोटी या प्रमुख मार्गांवर जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्या या नियमितपणे धावत असल्या तरी पावसाचा अंदाज घेऊन त्यांना पुढे जाण्याचा इशारा एस.टी. नियंत्रण कक्षाने दिला आहे.
मार्ग अद्याप बंद
- कोल्हापूर : गगनबावडा. संभाजीनगर : भोगाव, पाडसाळी, आरळे,
- इचलकरंजी : कुरुंदवाड
- गडहिंग्लज : कोवाड, नांगनूर
- गारगोटी : मोस्करवाडी, वाळवा बाचणीमार्गे कोल्हापूर, आजरा
- चंदगड : इब्राहिमपूर, भूजवडे, दोडामार्ग, बेळगाव-हेरा.
- कागल : हुपरी -रंकाळा, मुरगूड, बागणे, रंकाळा
- राधानगरी : शिरगाव, आमजाई व्हरवडे
- गगनबावडा : कोल्हापूर
- आजरा : देवकांडगाव, साळगाव, किटवडे. या मार्गांवरील वाहतूक पावसामुळे बंद करण्यात आली आहे.
सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून
- २९ जुलै : २४ फेऱ्यांचे १७७२ किलोमीटर रद्द
- ३० जुलै : २६८ फेऱ्यांचे १४३०० किलोमीटर रद्द
- ३१ जुलै : ३१५ फेऱ्यांचे १६५१५ किलोमीटर रद्द.
रेल्वे वाहतुकीवर काही अंशी परिणाम
पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही काही अंशी परिणाम झाला आहे. कोल्हापूर-मुंबई ही सह्याद्री एक्सप्रेस आणि कोल्हापूर - मुंबई ही कोयना एक्सप्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बाकीच्या मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे.