नवे पारगावच्या सभागृहासाठी २० लाख निधी देणार : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:00+5:302021-02-06T04:44:00+5:30

सरपंच प्रकाश देशमुख यांनी विकासकामांचा आढावा घेतला. १५ वा वित्त आयोग विकासकामांचे उद्घाटन व कोरोना काळात राबलेल्या शासकीय, डॉक्टर्स, ...

20 lakh fund for new Pargaon hall: Sadabhau Khot | नवे पारगावच्या सभागृहासाठी २० लाख निधी देणार : सदाभाऊ खोत

नवे पारगावच्या सभागृहासाठी २० लाख निधी देणार : सदाभाऊ खोत

Next

सरपंच प्रकाश देशमुख यांनी विकासकामांचा आढावा घेतला. १५ वा वित्त आयोग विकासकामांचे उद्घाटन व कोरोना काळात राबलेल्या शासकीय, डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मौला जमादार आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड यांचा सत्कार झाला.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक विजयसिंह घाटगे, पोलीस निरीक्षक अजित सिद यांना ‘ग्रामरत्न’ पुरस्काराने गौरविले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी महिला मेळाव्यात महिला व बाल अत्याचारासंबंधी कायदेविषयक माहिती दिली.

हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, माजी उपसभापती सुलोचना देशमुख, जि. प. सदस्या पुष्पाताई आळतेकर, उपसरपंच शुभदा पाटील, नामदेव नेर्लेकर, बाळासो बोने, बाळासो बंडगर, पांडुरंग सिद, डॉ. टी. जी. पाटील, आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी अंकुश गोरे यांनी आभार मानले.

फोटो ओळी : नवे पारगाव येथील ग्रामपंचायतीच्या ४८व्या वर्धापनदिन कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत. सोबत डॉ. प्रदीप पाटील, प्रदीप देशमुख, प्रकाश देशमुख, विजयसिंह घाटगे, अजित सिद, आदी उपस्थित होते.

Web Title: 20 lakh fund for new Pargaon hall: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.