‘केडीसीसी’च्या शाखेत २0 लाखांचा अपहार?लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:35 AM2017-07-28T01:35:18+5:302017-07-28T01:36:39+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) लक्ष्मीपुरी शाखेत सुमारे २0 लाखांचा अपहार झाल्याची माहिती हाती आली आहे. या संदर्भात बँकेकडे विचारणा केली असता दुजोरा मिळू शकला नाही.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) लक्ष्मीपुरी शाखेत सुमारे २0 लाखांचा अपहार झाल्याची माहिती हाती आली आहे. या संदर्भात बँकेकडे विचारणा केली असता दुजोरा मिळू शकला नाही.
या बँकेतील खातेदारांच्या बचत आणि चालू खात्यांवरील रकमा कर्मचाºयांनी स्वत:च्या पत्नीच्या नावे त्याच शाखेत खाते काढून हस्तांतरित केल्या आहेत. तेथून ही रक्कम उचलली आहे. गेले काही महिने हा व्यवहार सुरू होता. यासंदर्भात बँकेच्या मुख्यालयाकडे काही तक्रारी झाल्या असल्याचे समजते. त्यावरून बँकेचे अंतर्गत दक्षता पथकाचे अधिकारी आलासे यांनी तपासणी केली. त्यामध्ये हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या शाखेत पोपट साळोखे हे शाखाधिकारी आहेत. तर दोशी हे कॅशिअर आहेत. या अधिकाºयाने त्यांच्याकडेही या प्रकाराबाबत चौकशी केली असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार यामध्ये चार कर्मचारी व काही अधिकाºयांचाही सहभाग असल्याचे समजते. त्यामुळे अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या संदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी बँकेच्या बैठकीसाठी मुंबईत आलो आहे. त्यामुळे या संदर्भात माझ्याकडे काही माहिती उपलब्ध नाही.