कोल्हापुरातून २० प्रवासी विमानाने कोलकात्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:17 PM2020-08-25T18:17:59+5:302020-08-25T18:19:16+5:30

वाराणसीहून चार प्रवासी घेऊन विशेष विमान सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता कोल्हापूर विमानतळावर आले. येथून दुपारी ते कोलकात्याला रवाना झाले. त्यातून वीस प्रवासी गेले.

20 passenger planes from Kolhapur to Kolkata | कोल्हापुरातून २० प्रवासी विमानाने कोलकात्याला

कोल्हापुरातून २० प्रवासी विमानाने कोलकात्याला

Next
ठळक मुद्दे कोल्हापुरातून २० प्रवासी विमानाने कोलकात्यालाविशेष विमान सेवेलादेखील चांगला प्रतिसाद

 कोल्हापूर : वाराणसीहून चार प्रवासी घेऊन विशेष विमान सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता कोल्हापूरविमानतळावर आले. येथून दुपारी ते कोलकात्याला रवाना झाले. त्यातून वीस प्रवासी गेले.

वैद्यकीय उपचारासाठी वाराणसी येथून एका रुग्णाला घेऊन तिघेजण या विशेष विमानाने कोल्हापूरमध्ये आले. ही सेवा पुरविणाऱ्या विमान कंपनीने वाराणसी ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते कोलकाता असे हे विमान जाणार असल्याची माहिती प्रवाशांना दिली होती. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूरमधून २० जणांनी नोंदणी केली.

दुपारी तीन वाजता ते या विमानाने कोलकात्याला रवाना झाले. या विशेष विमान सेवेलादेखील कोल्हापूरमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूरहून विमान सेवा नियमितपणे सुरू असल्याचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी सोमवारी सांगितले.

Web Title: 20 passenger planes from Kolhapur to Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.