कोल्हापूर प्रादेशिक सेनेची भरतीत दुसऱ्या दिवशी २000 उमेदवारांची हजेरी
By admin | Published: April 4, 2017 05:18 PM2017-04-04T17:18:44+5:302017-04-04T17:20:47+5:30
मैदानी चाचणीनंतर कागदपत्रांची तपासणी, आजपासून मेडिकल
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ४ : टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फं्रट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईट इन्फ्रंटीतर्फे सुरू असलेल्या प्रादेशिक सेनेतील विविध पदांसाठी मंगळवारी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी २००० उमेदवारांनी हजेरी लावली. आज, बुधवारपासून प्राथमिक टप्प्यामधून निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.
बटालियन परिसर व कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया होत आहे. सोमवारी (दि. ३) पहिल्या दिवशी ७००० उमेदवारांनी हजेरी लावल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी २००० उमेदवारांनी हजेरी लावली. सकाळी सहा वाजता भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रथम मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामधून पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची उंची, छाती, वजन, कागदपत्रे यांची तपासणी करण्यात आली.
अशी होणार भरती
पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची दि. ५ ते ७ रोजी वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर दि. ८ व ९ रोजी लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाणार आहे.