नाभिक समाजातर्फे स्मशानभूमीला २० हजारांची शेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:18+5:302021-05-13T04:23:18+5:30
कोल्हापूर : कोरोना संक्रमणाच्या काळात नाभिक समाजाचे व्यवसाय बंद आहेत. रोजची कमाई बुडाली आहे. तरीही सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापुरातील ...
कोल्हापूर : कोरोना संक्रमणाच्या काळात नाभिक समाजाचे व्यवसाय बंद आहेत. रोजची कमाई बुडाली आहे. तरीही सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापुरातील नाभिक समाजातर्फे बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीला २० हजार शेणी दान करण्यात आल्या.
जगभरात कोरोनाची लाट पसरली असून, कोल्हापुरात या संसर्गामुळे मृत्यूदर वाढला आहे. त्यामुळे शहरातील पंचगंगा, कदमवाडी आणि कसबा बावडा स्मशानभूमीवरील ताणही वाढला आहे. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या शेणी आणि लाकूड फाटा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील विविध तालीम संस्थांना शेणी आणि लाकूड दान करण्याचे आवाहन केले आहे.
लॉकडाऊनमुळे आधीच दैनंदिन व्यवहार बंद आहेत. अशा परिस्थितीत नाभिक बांधवांनी समाजाप्रति असलेली आस्था, संवेदना जागृत ठेवून पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणी दान करण्याचा निर्णय घेतला. या समाजबांधवांवर उपासमारीची वेळ आली असतानाही समाजातील विविध संघटना एकत्र आल्या व त्यांनी २० हजार शेणी खरेदी केल्या. त्या बुधवारी महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांच्याकडे सुपूर्द केल्या.
फोटो क्रमांक - १२०५२०२१-कोल-नाभिक
ओळ - कोल्हापुरातील नाभिक समाजातर्फे बुधवारी महानगरपालिकेच्या स्मशानभूमीला २० हजार शेणी देण्यात आल्या. हातावरचे पोट असलेल्या नाभिक समाजाचे लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहेत, तरीही स्मशानभूमीला केलेली मदत इतरांना अनुकरणीय आहे.