शिरोळमध्ये २० हजार हेक्टर पिके पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:09+5:302021-07-27T04:24:09+5:30
शिरोळ : कृष्णा-पंचगंगा नदीच्या रुद्रावतारामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना फटका बसला असून, ७६ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. महापुरामुळे ...
शिरोळ
: कृष्णा-पंचगंगा नदीच्या रुद्रावतारामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना
फटका बसला असून, ७६ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. महापुरामुळे २० हजार
हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेती पिकवायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे.
२००५, २००६
मध्ये आलेल्या महापुरानंतर तब्बल तेरा वर्षांनंतर २०१९ मध्ये सर्व उच्चांक
मोडून महापुरामुळे तालुक्याची मोठी हानी झाली होती. यंदा पुन्हा एकदा
अतिवृष्टी व धरणातील विसर्गामुळे तालुका महापुराच्या मगरमिठीत सापडला आहे. कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा नदीच्या महापुरामुळे ४३ गावांना फटका
बसला असून, २४ गावांचा संपर्क तुटला आहे. २० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली
गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ऊस १६ हजार हेक्टर, भुईमूग ११८९,
सोयाबीन १२३१, भाजीपाला ५८७ व इतर पिकांचा समावेश आहे. पुरामुळे
जयासिंपूर-सांगली, अर्जुनवाड- मिरज, शिरोळ- नृसिंहवाडी, कुरूंदवाड-
इचलकरंजी आदी प्रमुख मार्ग बंद आहेत.
.........
७६ हजार नागरिकांचे स्थलांतर
आजअखेर १७४०० कुटुंबांतील ७६ हजार
नागरिकांनी स्थलांतर केले असून, ४४ निवारा केंद्रामध्ये १४ हजार ३३३
पूरग्रस्त वास्तव्यास आहेत. एनडीआरएफचे २२, लष्कराचे ८०, तर वजीर, पास, हेल्पिंग व आधार रेस्क्यू फोर्सचे १६६ जणांचे पथक बचावकार्यात
आहे. स्थानिक नावाडीदेखील मदतकार्यात आहे.
२६ शिरोळ