Kolhapur: बनावट सोने तारण ठेवून २१ लाखांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:07 PM2023-10-19T19:07:59+5:302023-10-19T19:08:19+5:30

सोने तारण ठेवून कर्ज दिलेल्या पतसंस्थांचे धाबे दणाणले

21 lakh fraud by pledging fake gold, case registered against two in aajra police | Kolhapur: बनावट सोने तारण ठेवून २१ लाखांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा नोंद

Kolhapur: बनावट सोने तारण ठेवून २१ लाखांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : आजरा येथील मुथ्थूट पिनकॉर्प या संस्थेत २१ लाख १७ हजार ३८०  रुपयांचे बनावट सोने ठेवून दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे शाखाधिकारी दिनकर रामचंद्र वडर ( रा. कानडेवाडी ता. गडहिंग्लज ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे. याप्रकरणी विशाल वसंतराव देसाई ( रा.नेवरेकर कॉलनी गांधीनगर आजरा ) व ऋतेश सुरेश माजिक ( रा.प्लॉट नंबर ७, एलोरा गार्डन, सूर्यवंशी माळ, सम्राटनगर, राजारामपुरी कोल्हापूर ) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून आजऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

बनावट सोने असल्याचे माहित असतानाही फसवणूक करण्याच्या उद्देशाने विशाल देसाई व ऋतेस माजिक यांनी १९ जुलै २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी २१ लाख १७ हजार ३८०  रुपयांचे बनावट सोने संस्थेत तारण ठेवून कर्ज रक्कम प्राप्त केली आहे. तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचेही सिद्ध झाले आहे. आर्थिक फायदा होण्याच्या उद्देशाने या दोघांनीही संस्थेची फसवणूक केली आहे असेही फिर्यादीत म्हटले आहे. 

पोलिसांनी दोघांच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद केला असून पोलीस उपनिरीक्षक के. डी. ढेरे अधिक तपास करीत आहेत. बनावट सोने देऊन संस्थांची आर्थिक फसून केल्याप्रकरणी आजऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. तर सोने तारण ठेवून कर्ज दिलेल्या पतसंस्थांचे धाबे दणाणले आहेत. अनेक संस्थांनी आपल्या संस्थेत आलेले तारण कर्जसाठीचे सोने तपासून घेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: 21 lakh fraud by pledging fake gold, case registered against two in aajra police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.