बिदालमध्ये दिवसात २१० बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2017 11:45 PM2017-05-07T23:45:49+5:302017-05-07T23:45:49+5:30

‘लिम्का बुक’कडून दखल : दुष्काळाविरोधातील लढ्यात २,४७५ जणांचे श्रमदान

210 booths in the day in Bidal | बिदालमध्ये दिवसात २१० बंधारे

बिदालमध्ये दिवसात २१० बंधारे

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे. त्यातूनच रविवारी २,४७५ लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून एका दिवसात २१० लहान बंधारे (लूज बोल्डर) बांधले. या श्रमदानाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने दखल घेतली असून, त्यांनी या श्रमदानाची माहितीही मागविली आहे.
बिदाल गावाने ‘वॉटर कप’ जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. ग्रामस्थांनी एका दिवसात २१० लहान बंधारे (लूज बोल्डर) श्रमदानातून बांधून नवा अध्याय रचला आहे. प्रत्येक लूज बोल्डरसाठी दहा लोक व एक दगड जुळणारा एक अनुभवी कारागीर असे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेला ग्रामस्थांबरोबरच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील ‘आयडीएल’च्या संस्थापिका वैशाली शिंदे यांचा ४५ जणांचा ग्रुप, माण मेडिकल डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ, वडगाव, खांडेवस्ती येथील ग्रामस्थांनीही उपस्थिती लावली होती.
1‘वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत माण तालुक्यातील ३२ गावांमध्ये कामे सुरू असून, या गावांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. बिदाल ग्रामस्थांनी एकी दाखवीत पावसाचे पडणारे पाणी मुरविण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. ग्रामस्थ दररोज सकाळी सहा वाजल्यापासून श्रमदानासाठी कामाच्या ठिकाणी पायी तसेच वाहनांनी येतात. त्यांच्या पिण्याचे पाणी व सरबताचीही सोय ग्रामस्थांतर्फे केली जाते.
2गावाला जैन फाउंडेशनने एक, शासनाचे दोन, शेखर गोरेंचे एक जेसीबी मशीन मोफत, तर अंकुश गोरे यांनी डिझेलवर एक मशीन पोकलेन दिली. तसेच ग्रामस्थांनी दोन पोकलेन, सहा जेसीबी भाड्याने घेतल्या आहेत. त्यातूनच रविवारच्या श्रमदानातून एका दिवसात २१० लहान बंधारे (लूज बोल्डर) बांधण्यात यश आले आहे.

Web Title: 210 booths in the day in Bidal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.