कोल्हापूर २२, तर अन्य जिल्ह्यांतील नऊजणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:12+5:302021-04-25T04:25:12+5:30
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, शनिवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ७८४ रुग्ण नोंदविण्यात आले ...
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, शनिवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ७८४ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २२ जण कोल्हापूर जिल्ह्यातील असून, नऊजण इतर जिल्ह्यांतील आहेत. पन्हाळा तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरामध्ये २०४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नगरपालिका क्षेत्रात ११८ रुग्ण आढळले आहेत. अन्य तालुक्यांचा विचार करता करवीर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९२, शिरोळमध्ये ७४, तर हातकणंगले तालुक्यात ७२ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १८१६ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २८७४ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १३३२ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ६६१३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
चौकट
३५७ रुग्ण बरे
कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण चांगले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ३५७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येण्याची भीती सोडून नागरिकांनी चाचणीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
चौकट
कोडोलीत तिघांचा मृत्यू
पन्हाळा तालुक्यातील पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे, तर कोडोलीतील तिघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. कोडोली येथील ५५ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर वाडी रत्नागिरी येथील ४२ वर्षीय पुरुष व देवाळे येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.
कोल्हापूर
साने गुरुजी वसाहत येथील ५४ वर्षीय महिला, कळंबा येथील ६१ महिला, कदमवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष, शिवाजी पार्क येथील ८२ वर्षीय महिला
करवीर
फुलेवाडी येथील ७१ वर्षीय महिला, गोकुळ शिरगाव येथील ८० वर्षीय महिला, गडमुडशिंगी येथील २७ वर्षीय पुरुष
हातकणंगले
रुकडी येथील ४५ वर्षीय महिला, अंबप येथील ८० वर्षीय महिला, सोपाननगर पेठवडगाव येथील ३५ वर्षीय पुरुष,
इचलकरंजी
लालबहादूर साेसायटी ४० वर्षीय पुरुष, शाहू हायस्कूलजवळ ६८ वर्षीय पुरुष
शाहूवाडी
थेरगाव येथील ४३ वर्षीय पुरुष
कागल
शाहूनगर कागल येथील ६० वर्षीय पुरुष, बाळेघोल येथील ७५ वर्षीय महिला
शिरोळ
मजरेवाडी येथील ४४ वर्षीय पुरुष
इतर जिल्हे
वैभववाडी सिंधुदुर्ग येथील ६८ वर्षीय पुरुष, लांजा तालुक्यात कळंबे येथील ८८ वर्षीय महिला, सांगोला तालुक्यातील येथील ४२ वर्षीय पुरुष, जांभूळवाडी (ता. वाळवा) येथील ६२ वर्षीय पुरुष, सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथील ८८ वर्षीय पुरुष, मलकापूर कऱ्हाड येथील २४ वर्षीय महिला व ६६ वर्षीय पुरुष, मंगळवेढा येथील ६५ वर्षीय पुरुष, मानखुर्द मुंबई येथील ३७ वर्षीय पुरुष.