शेंडा पार्कातील जळालेल्या २२ हजार झाडांना मिळणार नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:35+5:302020-12-29T04:24:35+5:30
(हॅलो अँकर करावा, चांगला विषय आहे : विश्वास पाटील) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आगीची झळ पोहोचलेल्या शेंडा पार्कातील ...
(हॅलो अँकर करावा, चांगला विषय आहे : विश्वास पाटील)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आगीची झळ पोहोचलेल्या शेंडा पार्कातील २२ हजार झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी कोल्हापुरातील वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनने पुढाकार घेतला असून ही झाडे जगविण्याचा निर्धार केला आहे. त्याकरिता दर तीन दिवसांनी चार टँकरद्वारे त्या झाडांना पाणी देण्याचे नियोजन केले आहे. समाजाने या कामासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन वृक्षप्रेमी अमोल बुड्डे यांनी केले आहे.
या आगीत एकूण ३२ हजार झाडे सापडली होती. या झाडांपैकी १० हजार झाडे संपूर्णपणे भस्मसात झाली. २२ हजार झाडांना कमी-अधिक प्रमाणात आगीची झळ पोहोचली. त्या झळ पोहोचलेल्या झाडांना जगविण्यासाठी विविध संस्था व वृक्षप्रेमींचे प्रयत्न सुरु आहेत. त्यापैकी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनने झाडांना पुनरुज्जीवन मिळण्यासाठी चार टँकरद्वारे रविवारी पाणी दिले. त्यासोबतच झाडांभोवती अळी व मिलचिंग केले. यापुढेही या उपक्रमाद्वारे दर तीन दिवसांनी टँकरद्वारे पाणी घातल्यास या सर्व झाडांना नव्याने पालवी फुटू शकते. त्याचे नियोजन करण्यात येत आहे.
कोल्हापुरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासारखी परिस्थिती नाही. तरीसुद्धा या झाडांना जगविण्यासाठी महापालिका, वनखाते पाणीपुरवठा करण्यास तयार नाही. त्यामुळे आता येत्या महिन्याभरात अशा पद्धतीने तीन दिवसआड पाणी घालून या झाडांना जगविण्यासाठी वृक्षप्रेमींनी, विविध संस्था, संघटना, उद्योजक यांनी पुढे येणे गरजेचे आहे. या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सागर वासुदेवन, निखिल कोळी, अभिजित गडकरी, नितीन डोईफोडे, अक्षय कांबळे, परितोष उरकुडे, प्रसाद भोपळे, सविता साळुंखे, विद्या पाथरे, अमृता वासुदेवन, पाचगाव ग्रामसेवक, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, फ्रायडे फोर फ्युचर, ग्रीन वळीवडे, ग्रीन स्कूल, सावली फोंडेशन, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲन्ड रिसर्च सोसायटी आदींनी सहभाग घेतला आहे. समाजाने त्यांना साधने उपलब्ध करून दिल्यास शेंडा पार्क पुन्हा हिरवागार होऊ शकतो.
फोटो : २८१२२०२०-कोल-ट्री०१,०३
ओळी :
कोल्हापुरातील शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना जगविण्यासाठी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनने रविवारी टँकरद्वारे पाणी घातले.
फोटो : २८१२२०२०-कोल-ट्री०२
ओळी :
कोल्हापुरातील शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना जगविण्यासाठी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी रविवारी टँकरद्वारे पाणी घातले.