कंटेनर-बस अपघातात २३ जखमी
By admin | Published: October 8, 2015 12:20 AM2015-10-08T00:20:29+5:302015-10-08T00:29:33+5:30
सहा गंभीर : खंडाळा येथे महामार्गावर पहाटे भीषण दुर्घटना
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर कंटेनर व खासगी प्रवासी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात बसमधील सहाजण गंभीर, तर बसचालकासह १७ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे साडेचार वाजता झाला.खासगी प्रवासी वाहतूक करणारी आराम बस (पीवाय०१ सीएफ २८४७) बंगलोरहून मुंबईकडे निघाली होती. यावेळी बसमध्ये ३३ प्रवासी होते. राजू हेमंत रेड्डी हा बस चालवित होता. तर दुसरा चालक कल्याणगौडा शंकरगौडा बरमगौडा हा आराम करीत होता. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत कोल्हापूरहून येणारा कंटेनर (एमएच ४६ एएफ ३८७३) अचानकपणे वळल्याने पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या खासगी प्रवासी बसची भीषण धडक बसली. यामध्ये बसमधील बसचालक राजू हेमंत रेड्डी (वय ४४, रा. शिवा कॉलनी, गोपगप्पा, ता. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक), क्लिनर वीरण्णा रकसणी (२६, रा. धारवाड, कर्नाटक), मुदगण कृष्णा (४६, रा. कामरान रोड, बंगलोर), चिराग रामशूर बक्षी (३६, रा. बाणेर-पुणे), प्रमोद रामेश्वर गिरी (३८, रा. भोसरी, पुणे), रामकुमार मुंदेवरम स्वामीराव (५४, रा. कामरान रोड, बंगलोर) हे गंभीर जखमी झाले, तर लता वसंत कुलकर्णी (६६, रा. पुणे), रमाकांत वसंत कुलकर्णी (३९, रा. पुणे), सिद्धार्थ रमाकांत कुलकर्णी (७, रा. पुणे), कुर्माराव सीमाचरण वीजपड्डी (२७, रा. मध्यमपालम, विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश), मोनिशा व्यंकटेश्वर नायडू (२३, रा. विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश), भरत चतुराम कुमावत (३२, रा. धुरवडी, ता. शिव, जि. बाडनेर, राजस्थान), प्रमोद दिगंबर कोलम (४१, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) तर इतर तीन किरकोळ जखमी झाले. कंटेनरचालक गणेश नामदेव वाघमोडे (२६, रा. पळसमंडळ, चव्हाणवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हाही जखमी झाला. (प्रतिनिधी)