जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत

By admin | Published: May 24, 2016 11:34 PM2016-05-24T23:34:09+5:302016-05-25T00:18:59+5:30

दुष्काळ दाहकतेत वाढ : एकूण १६३ गावे टंचाईग्रस्त

23 villages in the district have created new scarcity | जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत

जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत

Next

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत लोटली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या टंचाईग्रस्त गावांची संख्या १६२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक दुष्काळाची झळ भुदरगड, राधानगरी तालुक्यास बसत आहे. टंचाईग्रस्त गावात पिण्याचे पाणी देण्यासाठी जिल्हा प्रशासन विंधन विहिरींची खुदाई करणे, खासगी विहिर अधिग्रहन करणे, अशी कामे करीत आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ तीव्र होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे त्या गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ३० जूनअखेर टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे.
पहिल्या टप्यात प्रशासनाने ११३ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले. घोषित गावात तातडीने उपाययोजना केल्या. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांची यादी वाढत राहिली. नुकतेच पुन्हा २३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जाहीर करून प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहेत. आतापर्यंत ७३ विंधन विहिरींची खुदाई करण्यात आली आहे. विंधन विहिरीस पाणी न लागलेल्या ठिकाणी २२ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

Web Title: 23 villages in the district have created new scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.