विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून महिन्यात २३५ विमानांचे टेकऑफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:51 IST2024-12-13T11:50:22+5:302024-12-13T11:51:06+5:30

कोल्हापूर विमानतळ राहिले सर्वात व्यस्त

235 flights take off from Kolhapur in a month for assembly elections | विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून महिन्यात २३५ विमानांचे टेकऑफ

विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून महिन्यात २३५ विमानांचे टेकऑफ

कोल्हापूर : मुंबई, हैदराबाद, बंगळुरू या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या कोल्हापूरविमानतळाचा वापर सध्या वाढला असून विधानसभा निवडणुकीत एका महिन्यात कोल्हापूर विमानतळावर आतापर्यंतचे सर्वाधिक २३५ विमानांचे टेकऑफ व लँडिंग झाले आहे. वाढणारी प्रवाशांची संख्या, सोयी सुविधा, नाईट लँडिंग यामुळे कात टाकणाऱ्या कोल्हापूर विमानतळाची ही राजकीय उड्डाणे विमानतळ किती बिझी आहे याची साक्ष देऊन गेले.

विधानसभा निवडणुकीत प्रचारसभा, अर्ज भरणे, बैठका यासाठी देशभरातील सर्वच पक्षांचे नेते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आले होते. हे नेते स्वतंत्र विमानाने कोल्हापुरात आले. काही नेत्यांनी हेलिकॉप्टरवरही जास्त भर दिला होता. त्यामुळे १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या एका महिन्यात २३५ विशेष विमानांचे कोल्हापूर विमानतळावर टेकऑफ अन् लँडिंग झाले आहे. कोल्हापूर विमानतळावरून नियमित रोज चार विमानांचे टेकऑफ तर चार विमानांचे लँडिंग होते.

जवळपास एका आठवड्यात ५८ विमाने येथून ये-जा करतात. मात्र, त्या व्यतिरिक्त राजकीय नेते, उद्योजक यांचे विमाने, हेलिकॉप्टर या विमानतळावर सातत्याने उतरत असतात. लोकसभा निवडणुकीतही २७० विमानांची या विमानतळावरून ये-जा झाली आहे.

एकाच दिवशी २८ विमाने

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या एक दिवस आधी १७ नोव्हेंबरला कोल्हापूर विमानतळावर २८ इतक्या सर्वाधिक विमानांचे टेकऑफ अन लँडिंग झाले आहे. २० विशेष विमाने तर दैनंदिन ८ विमानांचा यात समावेश आहे. २०१८ पासून आतापर्यंत एका दिवशी इतक्या विमानांची प्रथमच ये-जा झाली. विशेष म्हणजे विमानतळ इतके बिझी असूनही सर्वच नेत्यांच्या विमानांना सोयीची वेळ दिल्याने त्यांच्या सभा वेळेत पार पडल्या.

Web Title: 235 flights take off from Kolhapur in a month for assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.