२३७५ जणांना कोरोनाची नव्याने लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:35+5:302021-07-19T04:17:35+5:30
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नव्याने २३७५ जणांना कोराची बाधा झाली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण करवीर तालुक्यात ...
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नव्याने २३७५ जणांना कोराची बाधा झाली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण करवीर तालुक्यात सापडले. वीस जणांचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यात ८ जणांचा मृत्यू झाला. १५५८ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण १३५२३ रुग्ण आहेत.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवत आहे. यामुळे चाचण्याची संख्या वाढवण्यात आली आहे. एकूण २० हजार ७४१ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी २३७५ जण कोरोनाबाधित मिळाले. आजरा, भुदरगड, शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा या तालुक्यात एकही मृत्यू नाही. पण बाधित रुग्ण आहेत. शहरातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ती २२६ वर आली आहे. यापेक्षा अधिक करवीर तालुक्यात ५१४ रूग्ण सापडले आहेत. चोवीस तासांत मृत झालेल्या २० पैकी ८ जण ६० वर्षावरील आहेत. पाच जण दीर्घकाळ आजारी होते.
चौकट
कोरोनाने मृत्यू झालेल्या शहरातील परिसराचे आणि ग्रामीणमध्ये तालुकानिहाय गावांची नावे अशी :
कोल्हापूर शहर : बुधवार पेठ, राजारामपुरी, जरगनगर, संभाजीनगर, राजारामपुरी, कळंबा.
हातकणंगले : बुवाची वाठार, इचलकरंजी, पेठवडगाव, कोरोची, खोतवाडी, कबनूर, इचलकरंजी, हेर्ले.
राधानगरी : व्हरवडे, आवळी बुद्रूक
करवीर : पाचगाव.
पन्हाळा : कोडोली.
कागल : रणदिवेवाडी.