हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २४ कोटी ८० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:48+5:302021-03-13T04:43:48+5:30

खोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २४ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, ...

24 crore 80 lakhs for roads in Hatkanangle assembly constituency | हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २४ कोटी ८० लाख

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २४ कोटी ८० लाख

Next

खोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २४ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार राजू आवळे यांनी गुरुवारी दिली.

यामध्ये राज्यमार्ग व प्रमुख जिल्हामार्ग यांचा समावेश आहे. अमृतनगर ते हातकणंगले रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

तसेच वडगाव-लाटवडे-खोची-दुधगाव या प्रमुख जिल्हा मार्गासाठी अडीच कोटी मंजूर झाले असून रुंदीकरणासह मजबुतीकरण होणार आहे. हातकणंगले-लक्ष्मी इंडस्ट्रीज- रुई फाटा तसेच रुई फाटा ते तळंदगे रस्ता या दोन्ही रस्त्यांसाठी साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पट्टणकोडोली-हुपरी रेंदाळ ते राज्य हद्द रस्ता दोन्ही बाजूंना गटारी बांधण्यासाठी ऐंशी लाख मंजूर झाले असल्याचे आमदार आवळे यांनी सांगितले.

Web Title: 24 crore 80 lakhs for roads in Hatkanangle assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.