शिरोळमधील रस्त्यांसाठी २४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:27 AM2021-03-09T04:27:53+5:302021-03-09T04:27:53+5:30
शिरोळ : महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिरोळ तालुक्यात प्रमुख रस्त्यांसाठी २४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
शिरोळ : महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिरोळ तालुक्यात प्रमुख रस्त्यांसाठी २४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे दळणवळणाला आणखी चालना मिळणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. रस्त्याच्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिरोळ तालुक्यामधील प्रमुख मार्गांसाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील रस्ते मजबूत असावेत, त्याचा दळणवळणाला फायदा व्हावा, यासाठी निधीची तरतूद झाली आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळेच तालुक्याच्या विकासात्मक कामाला निधी मंजूर झाला असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.