वॉक टेस्टमध्ये २४ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:57+5:302021-06-06T04:18:57+5:30

कोल्हापूर : महापालिका आरोग्य विभागातर्फे शनिवारी संजीवनी अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ मोहिमेत विविध व्याधीग्रस्त अशा ...

24 negative in walk test | वॉक टेस्टमध्ये २४ जण निगेटिव्ह

वॉक टेस्टमध्ये २४ जण निगेटिव्ह

Next

कोल्हापूर : महापालिका आरोग्य विभागातर्फे शनिवारी संजीवनी अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ मोहिमेत विविध व्याधीग्रस्त अशा १० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या १० व्याधीग्रस्त बालकांच्या कुटुंबांतील ४९ सदस्यांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यापैकी २४ नागरिकांची ॲंटिजन टेस्ट घेण्यात आली. हे सर्व जण कोरोना निगेटिव्ह आले. तर २० नागरिकांची आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आरोग्य प्रशासनाने शहरातील ४८३ व्याधीग्रस्त बालकांची यादी तयार केली आहे. यादीमधील व्याधीग्रस्त बालक असलेल्या कुटुंबांचा सर्व्हे माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. मोहिमेत बालकांच्या कुटुंबातील व्यक्तींची सहा मिनिट वॉक टेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षानुसार कोरोना चाचणी, उपचार व संदर्भसेवा देण्यात येत आहेत.

फोटो : ०५०६२०२१- कोल- मोहीम

कोल्हापूर महापालिका आरोग्य प्रशासनातर्फे माझा विद्यार्थी माझी जबाबदारी मोहिमेद्वारे व्याधीग्रस्त बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

Web Title: 24 negative in walk test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.